पालिकेच्या ‘कोरोना योद्धा’ कर्मचाऱ्यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:27 IST2021-02-05T08:27:22+5:302021-02-05T08:27:22+5:30
बीड : कोरोना संसर्गाच्या काळात अतिशय कठीण परिस्थितीत कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावले. आपल्या जिवाची पर्वा न करता शहराच्या विविध भागात ...

पालिकेच्या ‘कोरोना योद्धा’ कर्मचाऱ्यांचा सन्मान
बीड : कोरोना संसर्गाच्या काळात अतिशय कठीण परिस्थितीत कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावले. आपल्या जिवाची पर्वा न करता शहराच्या विविध भागात उपाययोजनांबरोबरच जनजागृतीही केली. हे काम खरोखरच कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी केले. प्रजासत्ताक दिनी पालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांचा काेरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.
बीड नगर परिषदेच्यावतीने कोरोना संसर्गाच्या काळात उकृष्ट कार्य करणाऱ्या पाणीपुरवठा, विद्युत, अग्निशमन, स्वच्छता व इतर विभागातील कर्मचाऱ्यांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मंगळवारी गौरविण्यात आले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर बोलत होते. कार्यक्रमास मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते. यावेळी रुपकांत जोगदंड, भाऊसाहेब पवार, अर्जुन जगताप, बबन चांदणे, अर्जुन चांदणे, मोहन धन्वे, शेख मुख्तार, शेख कासम, शेख इस्माईल, भारत गोरख चांदणे, राहुल टाळके, अमोल शिंदे, सुनील काळकुटे, प्रशांत जगताप, विष्णू कानतोडे, कोमल गावंडे, युवराज कदम, महादेव गायकवाड, भागवत जाधव आदींचा गौरव करण्यात आला.