शिक्षक सेनेतर्फे सुरेश बोरकर यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:49 IST2021-01-08T05:49:30+5:302021-01-08T05:49:30+5:30
सावरगाव : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, खापरी (केने) येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, नरखेडतर्फे सुरेश पुंडलिकराव बोरकर यांचा ...

शिक्षक सेनेतर्फे सुरेश बोरकर यांचा सन्मान
सावरगाव : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, खापरी (केने) येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, नरखेडतर्फे सुरेश पुंडलिकराव बोरकर यांचा सेवानिवृत्तीबद्दल सपत्निक शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी प्रशांत मोहोड तर प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी विशालसिंग गौर, सरपंच आश्विनी केने, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकर मानकर उपस्थित होते.
सुरेश बोरकर यांनी शैक्षणिक क्षेत्रात ३५ वर्ष काम केले आहे. शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात अतुलनीय कार्य करून त्यांनी शाळेचे नाव जिल्हास्तरावर पोहोचवले आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, नरखेड तालुकाध्यक्ष विवेक बोरकर, दिनेश डवंगे, पांडुरंग भिंगारे, सुनील ढोके, राजेंद्र बोरकर, सतीश ढबाले, राजेंद्र टेकाडे उपस्थित होते.