अंबाजोगाईत कोरोना योद्धयांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:22 IST2021-07-04T04:22:52+5:302021-07-04T04:22:52+5:30
अंबाजोगाई : कोरोनाच्या संकटात देवदूत बनून रुग्णांवर योग्य औषधोपचार करून त्यांचे प्राण वाचविणाऱ्या व ग्रामीण आरोग्याला बळकटी देणाऱ्या कोरोना ...

अंबाजोगाईत कोरोना योद्धयांचा सन्मान
अंबाजोगाई : कोरोनाच्या संकटात देवदूत बनून रुग्णांवर योग्य औषधोपचार करून त्यांचे प्राण वाचविणाऱ्या व ग्रामीण आरोग्याला बळकटी देणाऱ्या कोरोना योद्धयांचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी डॉक्टर सेलकडून सन्मान करण्यात आला.
अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय रुग्णालयात शुक्रवारी कोरोना योद्धयांचा सन्मानपत्र व शाल देऊन, फेटा बांधून यथोचित सेवागौरव करण्यात आला. यावेळी बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी, स्वारातीचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. शंकर धपाटे, सत्कारमूर्ती डॉ. संजय चव्हाण, डॉ. विशाल लेडे, डॉ. अनिल मस्के, डॉ. ईरा ढमढेरे, डॉ. अस्मिता उराडे, डॉ. एम.एच.कांबळे, डॉ. अमित लोमटे, डॉ. प्रमोद दोडे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी डॉ. विश्वजीत पवार, इतर डॉक्टर बांधव, औदुंबर मोरे, महादेव आदमाने, मनोज लखेरा, वाजेद खतीब, सुनील व्यवहारे, अमोल लोमटे, धम्मपाल सरवदे,
शेख मुख्तार, राणा चव्हाण, कचरूलाल सारडा, खालेद चाऊस, सुनील वाघाळकर, महेबूब गवळी, भारत जोगदंड, दिनेश घोडके, सचिन जाधव, अकबर पठाण, अजीम जरगर, शाकेरभाई काझी, अमोल मिसाळ यांच्यासह काँग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. प्रास्ताविक
महादेव आदमाने यांनी तर संचालन प्रा. अनंत कांबळे यांनी केले. आभार औदुंबर मोरे यांनी मानले.
030721\img-20210702-wa0117_14.jpg