दुचाकीच्या धडकेत होमगार्ड जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:21 IST2021-07-05T04:21:04+5:302021-07-05T04:21:04+5:30

बीड : घराकडून नगर नाक्याकडे पायी जाताना पाठीमागून आलल्या दुचाकीने जोराची धडक दिली. यात गृहरक्षक दलाचे जवान कुलकर्णी ...

Homeguard injured in two-wheeler collision | दुचाकीच्या धडकेत होमगार्ड जखमी

दुचाकीच्या धडकेत होमगार्ड जखमी

बीड : घराकडून नगर नाक्याकडे पायी जाताना पाठीमागून आलल्या दुचाकीने जोराची धडक दिली. यात गृहरक्षक दलाचे जवान कुलकर्णी जखमी झाले. १ जुलै रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास नगर नाका परिसरात एका खासगी रुग्णालयासमोर ही घटना घडली.

कुलकर्णी यांच्या तोंडाला व हाताला गंभीर जखम झाली आहे. या प्रकरणी होमगार्ड कुलकर्णी यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अनोळखी चालकाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. ही घटना घडली असताना परिसरात २० ते २५ जण होते. परंतु त्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली आहे. जर या नागरिकांनी गाडीचा नंबर घेतला असता तर दुचाकीस्वार सापडला असता. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून अज्ञात दुचाकी चालकाविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणी होमगार्ड कुलकर्णी यांनी केली आहे.

Web Title: Homeguard injured in two-wheeler collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.