गायरान हक्क अभियानचे तहसीलसमोर धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:24 IST2021-06-25T04:24:03+5:302021-06-25T04:24:03+5:30
धारूर : गायरान हक्क अभियानच्या वतीने तालुक्यातील गायरान धारकांच्या विविध मागण्यांसाठी गुरूवारी येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात ...

गायरान हक्क अभियानचे तहसीलसमोर धरणे
धारूर : गायरान हक्क अभियानच्या वतीने तालुक्यातील गायरान धारकांच्या विविध मागण्यांसाठी गुरूवारी येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
गायरान हक्क अभियानचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विलास लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी देण्यात आलेल्या विविध घोषणांनी तहसील परिसर दणाणला होता. आंदोलनास वंचित विकास आघाडीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. आंदोलनात गोविंद मस्के, परमेश्वर जोगदंड, प्रवीण जोगदंड, बन्सी गायसमुद्रे, विशाल धिरे, दीपक धिरे, अजय गायसमुद्रे, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष आकाश गायसमुद्रे, राकेश सिरसट आदींसह गायरानधारक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
===Photopath===
240621\img-20210624-wa0116.jpg
===Caption===
गायरान धारकाचे धारूर तहसील समोर धरणे अंदोलन