हिंगणी-नांदूर रस्त्याची दुरवस्था कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:27 IST2020-12-25T04:27:01+5:302020-12-25T04:27:01+5:30
पोलिसांनी गस्त वाढविण्याची मागणी वडवणी : वडवणीसह तालुक्यातील ग्रामीण भागात काही दिवसांपासून भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. अंधाराचा ...

हिंगणी-नांदूर रस्त्याची दुरवस्था कायम
पोलिसांनी गस्त वाढविण्याची मागणी
वडवणी : वडवणीसह तालुक्यातील ग्रामीण भागात काही दिवसांपासून भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. अंधाराचा फायदा घेत होणाऱ्या चोऱ्यांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी होत आहे. परंतु अद्यापही याकडे दुर्लक्ष होत आहे.
विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहर व परिसरात महावितरणच्या गलथान कारभारामुळे वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. याचा शहरी व ग्रामीण भागाला मोठा फटका बसत आहे. शेतकऱ्यांचा रबी हंगाम सुरू झाल्याने पिकांना पाणी देणे सुरू आहे. खंडित वीज पुरवठ्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकरी, सामान्यांमधून होऊ लागली आहे.
अंबाजोगाईत फुटपाथवर आक्रमण
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरात मुख्य रस्त्याच्या बाजूला फुटपाथ सोडण्यात आले आहेत. मात्र, या फुटपाथवर छोट्या व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे नागरिकांना फुटपाथवरून जाताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची मागणी शहरवासीयांमधून होत आहे.