महामार्गाचे काम अपूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:29 IST2021-02-05T08:29:20+5:302021-02-05T08:29:20+5:30
अस्ताव्यस्त पार्किंग बीड : शहरातील नगर रोड भागात नागरिक बेशिस्त वाहने उभी करीत आहेत. यामुळे रस्ता अरुंद होऊन ...

महामार्गाचे काम अपूर्ण
अस्ताव्यस्त पार्किंग
बीड : शहरातील नगर रोड भागात नागरिक बेशिस्त वाहने उभी करीत आहेत. यामुळे रस्ता अरुंद होऊन वाहतूक खोळंबत आहे. विशेषत: या भागात शासकीय कार्यालय असल्याने सतत वाहतूक असते. त्याच दरम्यान कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची वाहने रस्त्यावरच उभी राहतात.
टपऱ्यांमध्ये पेट्रोल
अंबाजोगाई : तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये असलेल्या पानटपऱ्या व विविध दुकानांमध्ये पेट्रोलची खुलेआम विक्री केली जाते. जवळच असलेल्या पेट्रोलपंपावरून मोठ्या प्रमाणात पेट्रोल आणले जाते व पेट्रोलमध्ये भेसळ करून ते चढ्या भावाने विकले जाते.
रस्त्याची दुरवस्था
केज : तालुक्यातील शिरूरघाट ते केज या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. मागील अनेक दिवसांपासून ही परिस्थिती असल्यामुळे रस्ता दुरुस्तीसंदर्भात मागणी करूनही दुर्लक्ष आहे.
अतिक्रमणांकडे दुर्लक्ष
पाटोदा : शहरातील बसस्थानकासह शासकीय कार्यालयांच्या इमारतींना अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. त्यामुळे रहदारीला अडथळा होत आहे. अतिक्रमण हटाव मोहिमेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. रस्त्यावर हातगाड्यांची गर्दी असते.
रॉकेलचा गैरवापर
गेवराई : गरिबांसाठी स्वस्त धान्य दुकानांवरील रॉकेल काळ्याबाजारात जात असून, त्याचा वापर वाहनांसाठी केला जात आहे. यामुळे प्रदूषण वाढत आहे, तर दुसरीकडे शिधापत्रिकाधारकांना रॉकेल मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.