माजलगावात हायप्रोफाईल सेक्स रॅकेट ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 23:54 IST2017-11-24T23:52:38+5:302017-11-24T23:54:21+5:30
माजलगाव शहरातील एका उच्चभ्रू कॉलनीत हायप्रोफाईल सेक्स रॅकेट सुरू होते. याचा पर्दाफाश काही सुजाण नागरिकांनी केला. त्यानंतर एका राजकीय व्यक्तीने यात हस्तक्षेप करुन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला.

माजलगावात हायप्रोफाईल सेक्स रॅकेट ?
माजलगाव : शहरातील एका उच्चभ्रू कॉलनीत हायप्रोफाईल सेक्स रॅकेट सुरू होते. याचा पर्दाफाश काही सुजाण नागरिकांनी केला. त्यानंतर एका राजकीय व्यक्तीने यात हस्तक्षेप करुन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आपल्याला याबाबत काहीच माहिती नाही, असे सांगून कानावर हात ठेवले. याची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
शहरातील एका भागात नुकतीच नवीन कॉलनी तयार झाली आहे. यामध्ये एका व्यक्तीकडून सेक्स रॅकेट चालविले जात होते. परंतु याच भागातील काही सुजाण नागरिकांनी याचा पर्दाफाश करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे त्यांनी ‘त्या’ घराला घेराव घालून आत असणा-या उच्चभ्रू आंबटशौकिन मंडळींना चांगलेच धारेवर धरत मारहाण केली. संतापलेल्या काही नागरिकांनी तर सदर घर हे जाळून देण्याचा देखील प्रयत्न केला. त्यामुळे वातावरण तणापूर्र्ण बनले होते.
याचवेळी एका राजकीय पुढा-याने यात हस्तक्षेप करीत संबंधिताला पाठीशी घातल्याचा आरोप आहे. त्याला हे प्रकरणही दाबण्यात यशही आले.
या प्रकाराबाबत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजु तळेकर म्हणाले, या बाबत आम्हाला कसल्याही प्रकारची माहिती नाही. या प्रकरणाची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी होत आहे.