'येथे' आहे भगवान पुरुषोत्तमाचे एकमेव मंदिर; अधिक मासात आहे अनन्यसाधारण महत्व  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 05:12 PM2018-05-15T17:12:11+5:302018-05-15T17:15:16+5:30

संपुर्ण भारतात भगवान पुरूषोत्तमाचे एकमेव मंदीर तालुक्यातील क्षेत्र पुरूषोत्तमपुरी येथे आहे. अधिक मासात येथे प्रसिद्ध यात्रा भरते, येत्या बुधवारपासून (दि.१६ ) सुरू होणाऱ्या या यात्रेची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे.

'Here' is the only temple of Lord Purushottam; Excessive importance is in excess of the mass | 'येथे' आहे भगवान पुरुषोत्तमाचे एकमेव मंदिर; अधिक मासात आहे अनन्यसाधारण महत्व  

'येथे' आहे भगवान पुरुषोत्तमाचे एकमेव मंदिर; अधिक मासात आहे अनन्यसाधारण महत्व  

Next
ठळक मुद्दे संपुर्ण भारतात भगवान पुरूषोत्तमाचे एकमेव मंदीर तालुक्यातील क्षेत्र पुरूषोत्तमपुरी येथे आहे. यावर्षी १६ मे ते १३ जूनपर्यंत ही यात्रा भरणार आहे. याची जय्यत तयारी ग्रामस्थांनी केली आहे.

- पुरूषोत्तम करवा

माजलगाव  (बीड ) : संपुर्ण भारतात भगवान पुरूषोत्तमाचे एकमेव मंदीर तालुक्यातील क्षेत्र पुरूषोत्तमपुरी येथे आहे. अधिक मासात येथे प्रसिद्ध यात्रा भरते, येत्या बुधवारपासून (दि.१६ ) सुरू होणाऱ्या या यात्रेची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. महिनाभर चालणाऱ्या या यात्रेत संपूर्ण महाराष्ट्रासह इतर राज्यातून भाविक दर्शनासाठी येतात. 

पुरूषोत्तम मास अर्थात धोंड्याचा महिना. या महिन्याला हिंदू धर्मात असाधारण महत्व असते. या महिन्यात श्रीक्षेत्र पुरूषोत्तमपुरी येथे अधिकमास उत्सव यात्रा भरते. या पर्वकाळात महाराष्ट्रासह परराज्यातून लाखो भाविक येथे दाखल होतात. गोदावरी काठावर वसलेले हे पुरूषोत्तमपुरी गाव राष्ट्रीय महामार्ग क्र- २२२ वर माजलगाव - गेवराई दरम्यानच्या सारवरगावपासून १० कि.मी. अंतरावर आहे. दर तीन वर्षांनी येणाऱ्या या पर्वकाळात येथे लाखो भाविक येतात. यावर्षी १६ मे ते १३ जूनपर्यंत ही यात्रा भरणार आहे. याची जय्यत तयारी ग्रामस्थांनी केली आहे.

१५०० वर्षांपूर्वीचे आहे मंदिर 
पवित्र पापनाशिनी गोदावरी तटावर पुरूषोत्तमाचे हे हेमाडपंथी मंदीर असून या मंदीराचे बांधकाम सुमारे १५०० वर्षापुर्वी झाल्याचे शिलालेख येथे आहे. या मंदीराचा कळस व बांधणी हे केदारनाथ मंदीर (उत्तराखंड) पध्दतीचे आहे व शेजारीच वरदविनायक, सहलक्षेश्वर महादेव, पार्वती पादुका मंदीर आहे व ही दोन्ही मंदीर जुनी असल्याचे दिसते. वरदविनायक मंदीर हे वृंदावनातील कृष्णमंदीराची प्रतिकृती असल्याचे दिसते. मुख्य पुरूषोत्तम मंदीरातील पुरूषोत्तमाची मुर्ती ही गंडळी शिलेची असून ती स्वयंभू असल्याचे सांगितले जाते. चतुर्थभुजाधारी पुरूषोत्तमाच्या हातात शंख, चक्र, पद्म असून मुर्ती मनमोहक अशी आहे.  हे मंदीर स्थापत्य कलेचा आदर्श नमुना असून मंदीराच्या विटा या पाण्यावर तरंगतात व मंदीरातल्या गरुडध्वजा पंढरपुर येथील मंदिराची आठवण करून देतात.
 

'पुरुषोत्तम' तेराव्या महिन्याचा स्वामी 
भारतीय संस्कृतीत धोंड्याच्या महिन्याला अनन्यसाधारण महत्व आहे. या महिन्यात पुरूषोत्तमाला सोन्याचे, चांदीचे, पुरणाचे, पेठ्याचे धोंडे अर्पण करण्याची प्रथा आहे. दर तीन वर्षांनी येणाऱ्या या अधिक मासाचे वर्णन धोंडे महाल या ग्रंथात असून बारा महिन्याचे बारा स्वामी असतात. परंतू उरी-सुरीच्या तेराव्या महिन्याचा स्वामी कोण होणार ? या वरून पुरूषोत्तमाने हे स्वामीत्व स्वीकारले व तेव्हापासून या महिन्याला 'पुरूषोत्तम मास' हे नाव पडल्याचा उल्लेख आढळतो. या महिन्यात जावयांना पुरणाचे धोंडे खावू घालण्याची प्रथा ही महाराष्ट्रातील घराघरात जोपासली जाते. अधिकमासात सौभाग्यवती स्त्रिया येथे गोदावरीत स्नान करून पतीच्या समृध्दी व दीर्घायुष्यासाठी पुरूषोत्तमाला ३३ धोंडे अर्पण करतात व सुखाची कामना करतात. त्यामुळे या महिन्यात राज्यातून अनेक महिला या यात्रेत सहभागी होत असतात.

हैद्राबाद येथे ताम्रपट व तांब्याचा गरुड
निजाम राजवटीत या स्थळाला फार मोठा मान होता. निजामाने या देवस्थानच्या देखरेखीसाठी शेकडो एकर जमीनी दिल्या होत्या. याबाबत ताम्रपट देवून त्यावर या जमिनी कोणाकडे वहितीसाठी द्याव्यात याचा उल्लेख होता. परंतू हे ताम्रपट व तांब्याचा गरुड हैद्राबाद येथील पुराणवस्तू संग्रहालयात संग्रहीत आहे. यामुळे या क्षेत्राच्या देखरेखीसाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नाही.

निजामाकडून न्याय, पण सरकारडून अन्याय
पौराणिकदृष्ट्या प्रसिध्द असणाऱ्या या मंदीराला निजाम सरकारने भरघोस मदत दिली होती. तीर्थक्षेत्राला न्याय देण्याचे काम त्यांनी केले होते,  त्याकाळीच येथे अनेक कामे झाली. परंतू; महाराष्ट्र शासनाने मात्र अद्याप यास पर्यटन स्थळाचा दर्जा दिला नाही. यामुळे एकमेवाद्वितीय असलेले हे मंदीर अद्याप विकासापासून कोसोदुर आहे. अनमोल ठेव्याचे जतन करून यास विशेष पर्यटन क्षेत्राचा दर्जा  मिळावा जेणेकरून येथे पायाभूत सुविधा उभारल्या जातील. रस्ते, भक्तनिवास, वाहनतळ, मंदिराची डागडुजी अशी अनेक कामे येथे तत्काळ करण्याची आवश्यकता आहे. 

Web Title: 'Here' is the only temple of Lord Purushottam; Excessive importance is in excess of the mass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app