मादळमोहीत भांडणाच्या कारणावरून एकावर भरदुपारी गोळीबार; गेवराई पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:24 IST2021-07-18T04:24:18+5:302021-07-18T04:24:18+5:30
मादळमोही येथील पवन गावडे या तरुणाचे महामार्गालगत घर व येथेच बांधकाम साहित्याचे दुकान आहे. दरम्यान, शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या ...

मादळमोहीत भांडणाच्या कारणावरून एकावर भरदुपारी गोळीबार; गेवराई पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
मादळमोही येथील पवन गावडे या तरुणाचे महामार्गालगत घर व येथेच बांधकाम साहित्याचे दुकान आहे. दरम्यान, शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास या दुकानासमोर पवन गावडे हे थांबले असता या ठिकाणी दोन तरुण मोटारसायकलवरून आले. यानंतर जुन्या भांडणातून दाखल असलेला गुन्हा परत घे म्हणून गावडे यांच्याशी हुज्जत घालत होते. त्यांच्या डोक्याला एका जणाने पिस्तूल लावून गोळी झाडली. यावेळी गावडे यांनी सतर्कता दाखविल्याने गोळी डोक्याला चाटून गेली. हा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी पवन गावडे यांच्या फिर्यादीवरून संजय पवार व अविनाश पवार (दोघे राहणार सावरगाव) या दोघांविरोधात शुक्रवारी रात्री उशिरा गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यातील आरोपी मात्र फरार आहेत. पुढील तपास सपोनि. संदीप काळे हे करीत आहेत.