शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वाल्मीक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुन्हा पुढे ढकलली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 14:25 IST

वाल्मीक कराड याचे वकील ॲड. अशोक कवडे यांनी सुनावणी पुढे ढकलण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला.

केज : तालुक्यातील मस्साजोग शिवारात उभारण्यात आलेल्या आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दोन कोटींची खंडणी मागून त्यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी केज न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावलेल्या व मकोकातील आरोपी वाल्मीक कराड याच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही सुनावणी गुरुवारी केज न्यायालयात होणार आहे.

मकर संक्रांतीच्या दिवशी वाल्मीक कराड याला खंडणीच्या गुन्ह्यात केज न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्याचवेळी त्याचे वकील ॲड. सिद्धेश्वर ठोंबरे यांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. १६ जानेवारी रोजी सरकारी वकील ॲड. जितेंद्र शिंदे यांनी म्हणणे मांडणारा से केज न्यायालयात दाखल करताच या प्रकरणाची सुनावणी शनिवारी १८ जानेवारी होईल, असे न्यायालयाने सांगितले होते.

दरम्यान, शनिवारी आरोपीचे वकील ॲड. अशोक कवडे यांनी डोळ्याच्या आजारामुळे ही सुनावणी पुढे ढकलण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यामुळे सोमवारी (दि. २०) सुनावणी ठेवली होती; परंतु सोमवारी दुपारी ३ वाजता सुनावणी सुरू होताच वाल्मीक कराड याचे वकील ॲड. अशोक कवडे यांनी सुनावणी पुढे ढकलण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. न्यायालयाने याला नकार देताच सरकारी वकिलांनी दिलेल्या से ची प्रत आम्हाला मिळालेली नाही. ती मिळावी, असा अर्ज केला. सरकारी वकील ॲड. शिंदे यांनी त्यांना से ची प्रत दिली. त्यानंतर ही सुनावणी आता गुरुवारी सकाळी ११ वाजता होईल, असे न्या. एस. व्ही. पावसकर यांनी जाहीर केले. त्यामुळे आता ही सुनावणी गुरुवारी केज न्यायालयात होणार आहे.

उद्या पोलिस कोठडी संपणारमकोका लागल्यानंतर वाल्मीक कराड याला २२ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. त्यामुळे आता त्याला बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यात आणखी कोठडी मिळते की कारागृहात रवानगी होते, याकडे लक्ष लागले आहे.

सरपंच हत्या प्रकरण : चौकशी समितीचे मुख्यालय बीडऐवजी मुंबईतबीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या न्यायालयीन चौकशी आयोगाचे मुख्यालय आता बीड ऐवजी मुंबईत असणार आहे. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती एम. एल. ताहलियानी यांच्या अध्यक्षतेखालील ही चौकशी समिती नियुक्त करण्यात आली असून समितीचे मुख्यालय बीड येथे राहील, असे पूर्वीच्या शासन निर्णयात म्हटले होते. मात्र, ताहलियानी यांच्या विनंतीनुसार आता हे मुख्यालय मुंबईला हलवले जाणार आहे. चौकशी प्रक्रियेतील कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि योग्य न्याय निर्णय घेण्यासाठी चौकशी समितीचे अध्यक्ष इतर ठिकाणी प्रवास करु शकतील, असा सुधारीत निर्णय शासनाने सोमवारी जारी केला.

टॅग्स :walmik karadवाल्मीक कराडbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणCrime Newsगुन्हेगारीBeedबीड