आरोग्य केंद्र वाऱ्यावर सोडून डॉक्टर गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 11:34 PM2019-11-14T23:34:03+5:302019-11-14T23:35:01+5:30

पाटोदा तालुक्यातील अंमळनेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील दोन्ही वैद्यकीय अधिकारी आरोग्य केंद्र वाºयावर सोडून तासन्तास गायब असतात.

The health center disappears doctors leaving the air | आरोग्य केंद्र वाऱ्यावर सोडून डॉक्टर गायब

आरोग्य केंद्र वाऱ्यावर सोडून डॉक्टर गायब

googlenewsNext
ठळक मुद्देरुग्णांचे हाल : अंमळनेर येथील प्रकाराने सामान्यांमध्ये संताप; दांडीबहाद्दर डॉक्टरांची होणार चौकशी

बीड/कुसळंब : पाटोदा तालुक्यातील अंमळनेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील दोन्ही वैद्यकीय अधिकारी आरोग्य केंद्र वाºयावर सोडून तासन्तास गायब असतात. यामुळे सामान्य रुग्णांचे हाल होत आहेत. विशेष म्हणजे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या भेटीतही दोन्ही अधिकारी गैरहजर असल्याचे समोर आले आहे. अशा कामचुकार डॉक्टरांमुळे आरोग्य विभागाची प्रतिमा मलीन होत असल्याची चर्चा आहे.
अंमळनेर, पिंपळवंडी, मिसाळवाडी, कोतन, डागाचीवाडी, शरदवाडी, जरेवाडी, धोपटवाडी आदी गावांतील लोक अंमळनेर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येतात. मात्र, येथील वैद्यकीय अधिकारी कायम गैरहजर रहात असल्याने नागरिकांना रिकाम्या हाताने परतून खाजगी रुग्णालयाचा रस्ता धरावा लागतो. यामुळे सामान्यांना सरकारी रुग्णालय असतानाही आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. गुरुवारीही केंद्रातील डॉक्टर वेळेवर हजर नव्हते. तसेच सायंकाळच्या सुमारासही काही रुग्णांनी डॉक्टर नसल्याच्या तक्रारी केल्या. कायम गैरहजर राहून रुग्णांची हेळसांड करणाºया डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी सामान्यांमधून होत आहे. परिसरातील आठ ते दहा गावातील रुग्ण उपचारासाठी या ठिकाणी येतात. मात्र, अधिकारीच जागेवर नसल्यास त्यांना हेलपाटा होता. परिणामी रुग्णालयातील तसेच औषधांवरील खर्च सहन करावा लागतो.
राजकीय नेत्यांकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न
आम्ही कसेही काम करु, आम्हाला कोणीच काही करु शकत नाही, असे म्हणत येथील डॉक्टर सामान्य रुग्णांना धमकावतात. आमची तक्रार केली तरी, ‘आमची ओळख वरपर्यंत आहे’ असे सांगून दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात. अनेकवेळा वरिष्ठांवरही येथील डॉक्टरांनी दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

Web Title: The health center disappears doctors leaving the air

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.