बीडमध्ये खोट्या चो-यांच्या तपासाने पोलिसांची डोकेदुखी; दीड महिन्यात तीन घटना उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 11:50 IST2017-12-29T00:22:26+5:302017-12-29T11:50:38+5:30
एरव्ही ख-या चो-यांचा तपास करताना पोलिसांच्या नाकीनऊ आले आहे. अशात काही नागरिक खोट्या चो-यांच्या तक्रारी करू लागल्याने आणखीनच ताण वाढला आहे. मागील दीड महिन्यात तब्बल तीन चो-या बनावट निघाल्याचे उघड झाले आहे. केवळ घरगुती वादातून असे बनाव केले जात आहेत. या तीनही घटनांत महिलाच ‘मास्टरमार्इंड’ असल्याचे समोर आले आहे.

बीडमध्ये खोट्या चो-यांच्या तपासाने पोलिसांची डोकेदुखी; दीड महिन्यात तीन घटना उघड
बीड : एरव्ही ख-या चो-यांचा तपास करताना पोलिसांच्या नाकीनऊ आले आहे. अशात काही नागरिक खोट्या चो-यांच्या तक्रारी करू लागल्याने आणखीनच ताण वाढला आहे. मागील दीड महिन्यात तब्बल तीन चो-या बनावट निघाल्याचे उघड झाले आहे. केवळ घरगुती वादातून असे बनाव केले जात आहेत. या तीनही घटनांत महिलाच ‘मास्टरमार्इंड’ असल्याचे समोर आले आहे.
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून गुन्ह्यांची संख्या घटविण्यासाठी जिल्हा पोलीस दल धावपळ करीत आहे. रात्रदिवस गस्त घालून चोºयांना आळा घालण्याचा प्रयत्न करीत आहे. रात्री गस्त सुरू असताना दिवसाच चोºया होऊ लागल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात होता. भरदिवसा चोºया झाल्याने पोलिसांचा वचक कमी झाला, असे आरोप केले जात होते. परंतु पोलिसांनी दिवसा झालेल्या चोºयांचा खोलवर जावून तपास केला असता अनेक धक्कादायक वास्तव समोर आले.
पहिली घटना पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच घडली. बँकेतून बाहेर पडल्यानंतर आपल्या हातातील एक लाख रूपये असलेली बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची तक्रार दीड महिन्यापूर्वी एका महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली. ऐन अधीक्षक कार्यालयासमोरच लुटमारीची घटना घडल्याने पोलीस दलात खळबळ उडाली होती. तपास केला असता या महिलेने बँकेतून पैसेच काढले नसल्याचे समोर आले. एवढेच नव्हे तर दिवसभरात एकाही ग्राहकाने एक लाख रूपयांची रक्कम बँकेतून काढल्याचे दिसले नाही. तक्रारदार महिलेने मात्र सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असलेल्या दोन मुलांवर संशय व्यक्त केला होता. त्या मुलांना विचारणा केली असता ते आपल्या वडिलांसोबत बँकेत आल्याचे समजले. यावरून हा सर्व प्रकार बनाव असल्याचे उघड झाले. आपल्याकडून खर्च झालेल्या पैशाचा घरी हिशोब कसा द्यायचा ? या भितीने महिलेने हा बनाव केला होता. यामध्येही विशेष पथकांसह शिवाजीनगर ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी हतबल झाले होते. यामध्ये तिच्याविरूद्ध अद्याप काहीच दाखल झालेले नाही.
दुसरी घटना शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत धोंडीपुरा भागात घडली. भरदिवसा आपल्या घरातून सहा लाख रूपये व दागिने चोरी झाल्याचा आरडाओरडा करण्यात आला. कॉन्स्टेबलपासून ते अधीक्षकांपर्यंत सर्वच या घटनेच्या तपासात व्यस्त झाले. विशेष पथके दाखल झाली. दुपारी एक वाजता झालेल्या चोरीचा तपास रात्री नऊ वाजता पोलिसांनी केला. सदरील महिलेने स्वार्थासाठी हे पैसे इतरत्र ठेवल्याचे समोर आले. चोरीची स्टोरी मात्र चित्रपटाला लाजवेल अशी केली होती. यामध्येही सदरील महिलेविरूद्ध अद्याप काहीच दाखल नाही.
तिसरी घटना शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत अंबिका चौकात दोन दिवसांपूर्वी घडली. सासू-सुनेचा दीड तोळ्याच्या सोन्याच्या गंठनसाठी वाद होता. सासुला गंठन द्यायचे नाही, या हेतून सुनेने चोरीचा बनाव केला. यामध्ये पोलिसांनी धावपळ करुन एका दिवसातच तपास लावला होता. यामध्येही सदरील महिलेविरूद्ध गुन्हा दाखल झालेला नाही, हे विशेष.
तीनही घटनांत महिलाच ‘मास्टरमार्इंड’
दीड महिन्यात घडलेल्या तिनही घटनांमध्ये महिलांनीच डोके लावले आहे. घरगुती वादातून त्यांनी हे सर्व केल्याचे पोलीस तपासातून समोर आले. यंत्रणेची एवढी धावपळ करूनही पोलिसांकडून त्यांच्यावर अद्याप कसलीच कारवाई झालेली नाही, हेही विशेष आहे. त्यांच्यावर कारवाई झाली नाही, तर यापुढेही असे बनाव होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
पोलीस यंत्रणेची धावपळ
भरदिवसा चो-या झाल्याने पोलीस दलात खळबळ तर नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. यांचा तपास लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांना होते.तपासाची चक्रे गतीने फिरविताच या तीनही चोºयांचा बनाव असल्याचे उघड झाले. यामध्ये मात्र पोलीस यंत्रणेची चांगलीच धावपळ झाली.