आग्रा ते राजगड शिवज्योत घेऊन धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:34 IST2021-08-15T04:34:32+5:302021-08-15T04:34:32+5:30
१७ ऑगस्ट रोजी आग्रा येथे छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला स्वराज्यातील राजगड, रायगड, पन्हाळा, प्रतापगड, लिंगाणा, वासोटा, हरिश्चंद्रगड, सुधागड, केंजळगड, रतनगड ...

आग्रा ते राजगड शिवज्योत घेऊन धावणार
१७ ऑगस्ट रोजी आग्रा येथे छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला स्वराज्यातील राजगड, रायगड, पन्हाळा, प्रतापगड, लिंगाणा, वासोटा, हरिश्चंद्रगड, सुधागड, केंजळगड, रतनगड अशा ५१ किल्ले तसेच गंगा, अलकनंदा, यमुना अशा सात नद्या व कळसुबाई, शिवथरघळ येथील पाण्याने जलाभिषेक करण्यात येणार आहे. शिवस्मरण प्रवास मार्गात दहा हजार वृक्षाच्या बिया टाकण्यात येणार आहेत. राजगडावरील माती नेऊन आग्रा येथे व आग्रा येथील माती आणून राजगडावर वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
आग्रा येथील शिवज्योत परिक्रमा आरंभ कार्यक्रमास राजगड ग्रंथाचे लेखक राहुल नलावडे (पुणे), बीडचे दुर्गप्रेमी कचरू चांभारे, सोपान तुपे, तानाजी राजगुडे (पुणे), श्रीरंग राहिंज अहमदनगर हे आग्रा येथील कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत, ॲड. गोेळे यांनी सांगितले.