सीम बंद होणार असल्याचे सांगून १ लाखाला फसवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:04 IST2021-03-04T05:04:03+5:302021-03-04T05:04:03+5:30
बीड : ‘तुमचे बीएसएनएलचे सीम कार्ड बंद पडणार आहे’, मी तुम्हाला एक लिंक टाकतो, ते ॲप डाऊनलोड करा ...

सीम बंद होणार असल्याचे सांगून १ लाखाला फसवले
बीड : ‘तुमचे बीएसएनएलचे सीम कार्ड बंद पडणार आहे’, मी तुम्हाला एक लिंक टाकतो, ते ॲप डाऊनलोड करा आणि ११ रुपये पाठवा, त्यानंतर तुमचे कार्ड सुरू होईल, असे म्हणत एका शिक्षिकेच्या खात्यातून १ लाख ४ हजार ४९३ रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार परळी शहर पोलीस ठाणे हद्दीत घडला आहे.
सुमेदा दयानंद हाबूब (रा.सरकारवाडा, अंबावेस परळी) या शिक्षिकेच्या मोबाईलवर ७०७४८७१५२१ या क्रमांकावरून २ मार्च रोजी फोन आला होता. यावेळी ‘तुमचे बीएसएनएल कार्ड डी ऍक्टिवेट होणार आहे. ते सुरू ठेवण्यासाठी तुम्हाला एक ॲप डाऊनलोड करावे लागेल’, असे म्हणत त्या व्यक्तीने एक लिंक पाठवली. दरम्यान सुमेदा यांना त्या लिंकद्वारे ११ रुपये पाठवण्यास सांगितले, एकदा पैसे पाठवल्यानंतर त्या व्यक्तीने पुन्हा ११ रुपये पाठवण्यास सांगितले, अशा प्रकारे सुमेदा यांनी दोन वेळेस ११ रुपये पाठवले होते. हे पैसे त्यांनी डेबीड कार्डच्या माध्यमातून पाठवले होते. त्यानंतर त्यांच्या बॅंक खात्यातून १० हजार, २० हजार, २० हजार ४७२, ३० हजार रुपये, १२ हजार ९९९ रुपये नंतर १० हजार रुपये, ५०० आणि त्यानंतर ५ हजार रुपये असे एकूण १ लाख ४ हजार ४९३ रुपये लंपास करण्यात आले. रक्कम काढल्याचा संदेश मोबाईलवर आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर तात्काळ ते डेबिटकार्ड ब्लॉक केले व परळी शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोनि कदम हे करत आहेत.
नागरिकांनी सकर्त राहवे
कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगून आर्थिक फसवणूक होण्याचे प्रमाण वाढले आहे. बॅंक किंवा कोणतीही कंपनी बॅंक खात्यासंदर्भात माहिती मागत नाही. त्यामुळे अशा प्रकारची माहिती कोणाला देऊ नये जेणेकरून होणारी फसवणूक टाळता येईल असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.