शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

बीड पालिकेत कहर, सफाई कामगाराचा अधिकाऱ्यासारखा रूबाब; लाच घेताना ACB कडून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 17:26 IST

सफाईचे काम सोडून अधिकाऱ्याच्या रूबाबात अभिलेखे विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला एसीबीकडून रंगेहाथ अटक

बीड: नगर पालिका निवडणुकीच्या धामधुमीतच बीड नगर पालिका पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मागील महिन्यातच अविनाश धांडे नामक कर्मचाऱ्याने वरिष्ठ आणि सहकारी कर्मचाऱ्यांची नावे लिहून पालिकेच्या छतावर आत्महत्या केली होती. या घटनेची चौकशी सुरू असतानाच, आता मंगळवारी पालिकेतील एका सफाई कामगाराला एक हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.

तक्रारदार यांनी एका महिन्यापूर्वी प्लॉट विक्रीसाठी अर्ज केला होता. त्यांना त्यांच्या प्लॉटची गुंठेवारीची प्रत खरी आहे की खोटी, हे पालिका अभिलेखे विभागाने ठरवून देणे आवश्यक होते. यासाठी तक्रारदारांनी रितसर शुल्क पालिकेत भरले होते. परंतु, अभिलेखे विभागात कार्यरत असलेल्या आशिष मस्के या सफाई कामगाराने हे काम करून देण्यासाठी तक्रारदाराकडे एक हजार रुपयांची लाच मागितली. एवढेच नव्हे तर, त्याने तक्रारदारांशी उद्धट वर्तनही केले होते. या त्रासाला कंटाळून तक्रारदारांनी बीडच्या एसीबीकडे तक्रार नोंदवली. एसीबीच्या पथकाने मंगळवारी दुपारी बीड पालिकेच्या आवारातच सापळा लावला. आशिष मस्के याने पैसे स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला तातडीने ताब्यात घेतले. एका कर्मचाऱ्याच्या आत्महत्येमुळे पालिका आधीच चौकशीच्या फेऱ्यात असताना, लगेच दुसऱ्या महिन्यात लाचखोरीचे प्रकरण उघडकीस आल्याने पालिका प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. एसीबीची ही कारवाई पोलिस उपअधीक्षक सोपान चिट्टमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.

आशिषचे पद कामगार, पण रूबाब अधिकाऱ्याचाआशिष हा सफाई कामगार आहे. त्याने शहरात फिरून नियमित स्वच्छता करणे अपेक्षित आहे. परंतू त्याचा रूबाब अधिकाऱ्यांपेक्षा कमी नव्हता. त्याने स्वच्छता तर कधी केलीच नाही, परंतू अभिलेखे कक्षात राहून सामान्यांची कामे अडविणे, त्यांच्याकडून पैसे घेणे, असे प्रकार केल्याचे सांगण्यात आले. आता या विभागाचे प्रमुख आणि स्वाक्षरी करणारे अधिकारीही अडचणीत आले आहेत. आगोदरच या अधिकाऱ्यांची धांडे आत्महत्या प्रकरणात चौकशी सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Beed Municipality Worker Arrested for Bribery, Acting Like an Officer

Web Summary : A Beed municipality cleaning worker, Ashish Maske, was arrested for accepting a bribe to process a land document. Maske allegedly demanded money and acted rudely. This follows a recent employee suicide, raising concerns about municipal administration.
टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याMunicipal Corporationनगर पालिका