शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

सत्ता असताना एक तरी विकासाचे काम केले का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 00:15 IST

राज्यात आणि केंद्रात सत्ता असताना तुम्ही विकासाचे एक तरी काम केले का? मग कोणत्या तोंडाने जनतेला मत’ मागता ? किती दिवस भूलथापा देणार अशा शब्दांत भाजपा महायुतीच्या उमेदवार, राज्याच्या ग्राम विकास आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी टोकवाडीच्या सभेत राष्ट्रवादीवर शरसंधान साधले. पंकजा मुंडे यांनी या सभेत विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.

ठळक मुद्देपंकजा मुंडे यांचा विरोधकांना सवाल : टोकवाडीच्या सभेत राष्ट्रवादीवर शरसंधान

परळी : राज्यात आणि केंद्रात सत्ता असताना तुम्ही विकासाचे एक तरी काम केले का? मग कोणत्या तोंडाने जनतेला मत’ मागता ? किती दिवस भूलथापा देणार अशा शब्दांत भाजपा महायुतीच्या उमेदवार, राज्याच्या ग्राम विकास आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी टोकवाडीच्या सभेत राष्ट्रवादीवर शरसंधान साधले. पंकजा मुंडे यांनी या सभेत विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.बुडत्या जहाजात बसू नकाराष्ट्रवादीचे जहाज आता बुडणार त्यात बसू नका असे सांगून त्या म्हणाल्या की, विरोधक आता विकासाच्या गप्पा मारत आहेत,पण गल्ली ते दिल्ली त्यांची सत्ता होती तेंव्हा त्यांनी एक तरी विकासाचे काम केले का? मग आता कोणत्या तोंडाने मतदान मागत आहेत. मला मिळणारा प्रतिसाद पाहून राष्ट्रवादीच्या पोटात गोळा आला आहे म्हणून निवडणूक जड असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. खोटे बोलण्यात त्यांना पीएच.डी. मिळाली आहे मात्र जनता सर्व ओळखून आहे. म्हणून ती माझ्या पाठीशी आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. येणारी सत्ता ही भाजपा महायुतीची असणार आहे आणि मी त्या माध्यमातून उर्वरित विकास पूर्ण करणार आहे. गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत. त्यावरून आपले महत्त्व लक्षात घ्या. येणाऱ्या काळात मोठी संधी मिळणार आहे. त्यामुळे मला भरभरून आशिर्वाद द्या असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले.यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष शिवाजी गुट्टे, बंकटराव कांदे, निळकंठ चाटे, श्रीराम मुंडे, राजाभैया पांडे, मारूती मुंडे, सुग्रीव मुंडे, जगन्नाथ मुंडे, संजय मुंडे, रामकिशन काळे यांच्यासह जिरेवाडी गटातील सर्व गावचे सरपंच, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.विकासासाठी तुमचा आशीर्वाद गरजेचागेल्या पाच वर्षांत मी आपल्या भागाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे ग्रामीण भागात विकास पोहचला आहे. चांगले रस्ते झाले, पाण्याची व्यवस्था झाली.मी विकासाला गती देण्याचे काम केले, ही गती वाढविण्यासाठी मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे असे त्या म्हणाल्या.मी मताचे राजकारण करीत नाही तर विकासाचे करते. मतदारसंघाच्या विकासासाठी भरपूर निधी दिला. अनेक विकास कामे झाली हे मतदारांना माहीत असल्याचेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019beed-acबीडPankaja Mundeपंकजा मुंडेBJPभाजपा