शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

माजलगाववर पसरला हानिकारक कार्बनचा थर; जय महेश कारखान्याच्या काजळीने नागरिक त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2023 15:43 IST

कारखान्याची अॅश हॅण्डलिंग सिस्टीम नादुरुस्त; गाळप संपेपर्यंत सहन करावा लागणार त्रास

- पुरूषोत्तम करवामाजलगाव : येथून जवळच असलेल्या जय महेश शुगर्स साखर कारखान्याच्या धुराढ्यातून निघालेल्या काजळीमुळे माजलगाववर हानिकारक काळा थर पसरत आहे. शहरातील नदीकाठी असलेले रहिवासी यामुळे त्रस्त झालेत. घराघरात दररोज कार्बनचा साचलेला काळा थर स्वच्छ करताकरता महिलांच्या नाकीनऊ येत आहेत. विशेष म्हणजे, ही काजळी आरोगयास हानिकारक ठरत असून अनेकांना श्वसनाचे त्रास सुरू झाला असल्याचे सांगितले जात आहे.

शहरापासून जवळपास ५ कि.मी. अंतरावर असलेल्या एनएसएल शुगर्स या खाजगी ग्रुपच्या जय महेश साखर कारखान्याचे सध्या गाळप सुरू आहे. या गाळपामुळे तेथील बॉयलरचे धुराडे सतत पेटलेले असते या धुराढ्यातून मागील एक महिन्यापासून काजळी बाहेर पडत आहे.  दररोज रात्री व पहाटे वाऱ्याच्या प्रवाहानुसार ती काजळी हवेतून उडत माजलगाव शहरातील नदीकाठी असलेला भाग यामध्ये साठे नगर, पाटील गल्ली, रंगार गल्ली, सिद्धेश्वर नगर, सन्मित्र कॉलनी, खंडोबा मैदान आदी भागांमध्ये ही काजळी घराच्या गच्चीवर, घराच्या अंगणात व घरातील फरशीवर आढळून येत आहे.

हा कार्बनचा काळा थर स्वच्छ करता करता महिला त्रस्त झाल्या आहेत. या काजळीमुळे वयोवृध्दांना श्वसनाचा त्रास होऊ लागले आहेत. याबाबत माहितगार सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक साखर कारखान्यावर अशा पद्धतीने राख उडून  जाऊ नये यासाठी ऍश हॅण्डलिंग सिस्टीम असते या सिस्टीम मुळे काजळी उडण्या ऐवजी खाली पाण्याचा सुरू असलेल्या प्रवाहात जाऊन पडते व त्यामुळे ती उडत नाही .याबाबत महसूल प्रशासनाने तात्काळ प्रदूषण महामंडळाची संपर्क साधून चौकशी करण्याची मागणी होत आहे.

एक महिन्यापासून त्रास मागील जवळपास एक महिन्यापासून सदरील काजळीचा काळा थर दररोज आमच्या अंगणात घरात व गच्चीवर पडत आहे.- डॉ. सचिन देशमुख, रहिवासी, सन्मित्र कॉलनी

कारखान्याची सिस्टीम फेलआमच्या कारखान्याची अॅश हॅण्डलिंगसिस्टीम मागील अनेक दिवसांपासून फेल झालेली आहे. परंतु, ती दुरुस्त करण्यासाठी बॉयलर बंद करावे लागते.सध्या गाळप सुरू असल्याने बॉयलर बंद करता येत नाही. त्यामुळे ज्यावेळेस बॉयलर बंद करण्यात येईल त्यावेळेस सदर यंत्रनेची दुरुस्ती करण्यात येईल.- व्यंकट कृष्णाराव, प्रशासकीय व्यवस्थापक जय महेश शुगर्स

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेBeedबीडenvironmentपर्यावरण