माजलगाव तालुक्यात गारांचा पाऊस, पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:32 IST2021-03-21T04:32:56+5:302021-03-21T04:32:56+5:30
माजलगाव तालुक्यात गारांचा पाऊस, पिकांचे नुकसान माजलगाव : तालुक्यातील पात्रुड परिसरात शनिवारी ५ वाजण्याच्या सुमारास वाऱ्यासह गारांचा पाऊस पडल्याने ...

माजलगाव तालुक्यात गारांचा पाऊस, पिकांचे नुकसान
माजलगाव तालुक्यात गारांचा पाऊस, पिकांचे नुकसान
माजलगाव
: तालुक्यातील पात्रुड परिसरात शनिवारी ५ वाजण्याच्या सुमारास वाऱ्यासह गारांचा पाऊस पडल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
माजलगाव तालुक्यात गुरुवारी संध्याकाळी वादळी वारे व थोड्या प्रमाणात पाऊस झाला होता. त्यानंतर, शनिवारी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास अचानक विजांचा कडकडाट व वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. तालुक्यातील पात्रुड परिसरात असलेल्या लोणगाव, लवूळ, डाकेपिंपरी, मोगरा, राजेवाडी, शिंदेवाडी, पवारवाडी, आनंदगाव, शु. लिमगाव, घळाटवाडी यासह अनेक गावांत गारपीटही झाली. या गारा हरभ-याच्या आकाराच्या होत्या. यामुळे शेतात उभ्या असलेल्या टरबूज, हरभरा, ज्वारी, बाजरी, गहू आदी पिकांचे नुकसान झाले आहे. पाऊस व गारांमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.