ए. एच. वाडिया वाचनालयात गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:26 IST2021-01-13T05:26:35+5:302021-01-13T05:26:35+5:30
बीड : शहरातील ए. एच. वाडिया सार्वजनिक वाचनालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सावित्रीबाई फुले ...

ए. एच. वाडिया वाचनालयात गौरव
बीड : शहरातील ए. एच. वाडिया सार्वजनिक वाचनालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मंडळाच्या उपाध्यक्षा डॉ. रोहिणी वैद्य, सदस्या डॉ. हेमलता पाटील व संचालिका नीलिमा पाटांगणकर, अनुराधा खरवडकर उपस्थित होत्या. सविता तोतला, सुषमा निंबाळकर, पल्लवी जाजू, अश्विनी करपे, अर्चना नेवडे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या पुस्तकातील उतारे वाचून दाखवले.
आरटीओ कार्यालयात एजंटांची गर्दी
बीड : येथील आरटीओ कार्यालयात सध्या एजंटांची गर्दी पुन्हा वाढू लागली आहे. परवाना व इतर कागदपत्रे काढण्यासाठी हे एजंट पैशांची मागणी करून सामान्यांची आर्थिक लूट करत असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे सामान्यांच्या कामांकडे दुर्लक्ष करून एजंटांच्या कामाला येथील अधिकारीही प्राधान्य देत आहेत. यामुळे सर्वसामान्यांचे कामे होईनासे झाले आहेत.
बांधकाम साहित्य रस्त्यावरच
अंबाजोगाई : शहरात ठिकठिकाणी बांधकामे सुरू आहेत. बांधकाम करताना लागणारे वाळू, खडी, विटा हे बांधकाम साहित्य सातत्याने रस्त्यावरच टाकण्यात येते. परिणामी शहरवासियांना रस्त्यावरून ये-जा करताना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. ढिगाऱ्यातील वाळू रस्त्यावर पसरत असल्याने दुचाकी व अन्य वाहने घसरत आहेत. यामुळे लहान-मोठ्या अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. रस्त्यावरील हे साहित्य हटविण्याची मागणी होत आहे.