परळीत पावणेदोन लाखांचा गुटखा नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 00:32 IST2019-02-24T00:32:03+5:302019-02-24T00:32:48+5:30
अडीच महिन्यांपूर्वी पकडलेला पावणेदोन लाख रूपयांचा गुटखा शनिवारी न्यायायालयाच्या आदेशानुसार नष्ट करण्यात आला. ही कारवाई पोलीस, अन्न व औषध प्रशासनाच्या उपस्थितीत करण्यात आली.

परळीत पावणेदोन लाखांचा गुटखा नष्ट
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : अडीच महिन्यांपूर्वी पकडलेला पावणेदोन लाख रूपयांचा गुटखा शनिवारी न्यायायालयाच्या आदेशानुसार नष्ट करण्यात आला. ही कारवाई पोलीस, अन्न व औषध प्रशासनाच्या उपस्थितीत करण्यात आली.
१० डिसेंबर २०१८ रोजी परळी शहरातील हिंदनगर भागात विष्णू शिंदे यांच्या घरी पोलिसांनी धाड टाकून १ लाख ८० हजार रूपयांचा गुटखा जप्त केला होता. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने पंचनामा करून संभाजीनगर पोलीस ठाण्यात शिंदे विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. शनिवारी न्यायालयाच्या आदेशानुसार हा सर्व गुटखा नष्ट करण्यात आला. यावेळी अन्न सुरक्षा अधिकारी ऋषिकेश मरेवार, मुक्तार शेख, बालाजी शेंडगे, संभाजीनगर ठाण्याचे सपोनि पठाण आदींची उपस्थिती होती.