शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
4
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
5
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
6
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
7
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
8
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
9
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
10
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
11
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
12
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
13
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
14
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
15
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
16
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
17
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
18
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
19
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप
20
अहमदाबाद विमानतळावर मोठी कारवाई, इस्लामिक स्टेटचे ४ दहशतवादी पकडले, श्रीलंकेचे कनेक्शन उघड

सुनावणीत फुटणार गुरुजींच्या बोगसगिरीचे बिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 1:17 AM

बीड : आंतर जिल्हा आणि जिल्हांतर्गत बदल्यांच्या प्रक्रियेदरम्यान खोटी, चुकीची तसेच दिशाभूल करणारी माहिती भरणाऱ्या ४१५ शिक्षकांच्या संदर्भात जिल्हा परिषद प्रशासनाकडे तक्रारी आल्यानंतर या शिक्षकांची गुरुवारी वरिष्ठ अधिका-यांसमक्ष सुनावणी होणार आहे. या सुनावणीत अनेक शिक्षक दोषी आढळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या आंतरजिल्हा तसेच जिल्हांतर्गत बदल्या मे- जूनदरम्यान झाल्या ...

बीड : आंतर जिल्हा आणि जिल्हांतर्गत बदल्यांच्या प्रक्रियेदरम्यान खोटी, चुकीची तसेच दिशाभूल करणारी माहिती भरणाऱ्या ४१५ शिक्षकांच्या संदर्भात जिल्हा परिषद प्रशासनाकडे तक्रारी आल्यानंतर या शिक्षकांची गुरुवारी वरिष्ठ अधिका-यांसमक्ष सुनावणी होणार आहे. या सुनावणीत अनेक शिक्षक दोषी आढळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या आंतरजिल्हा तसेच जिल्हांतर्गत बदल्या मे- जूनदरम्यान झाल्या होत्या. या प्रक्रियेत काही शिक्षकांनी चुकीची माहिती भरून शासनाची दिशाभूल केल्याबाबत अन्याय झालेल्या शिक्षकांनी केल्या होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने तालुका पातळीवर सुनावणी झाली होती. गटशिक्षणाधिका-यांच्या अहवालानुसार जिल्ह्यातील १८ शिक्षकांनी चुकीची तसेच दिशाभूल करणारी माहिती सादर केल्याचे स्पष्ट झाले. या शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. मात्र यानंतरही तक्रारींचा ओघ सुरु होता. त्यामुळे जि. प. प्रशासन व शिक्षण विभागाकडे आलेल्या ४१५ तक्रारींची गुरुवारी सुनावणी होणार आहे.दोघांनाही बोलावलेबदली झालेले शिक्षक व त्यांच्या जागेसंदर्भात तक्रार करणारे शिक्षक या दोघांना या सुनावणीसाठी बोलावण्यात आले आहे. वर्ग - १ चे अधिका-यांसमोर ही सुनावणी होणार आहे.अनेक शिक्षक झाले विस्थापितअपंग व मतीमंद पाल्याच्या दाखल्याचा वापर केवळ बदलीमधून सवलत मिळण्यासाठी अनेक शिक्षकांनी केला होता. समाज कल्याण विभागाचे प्रमाणपत्रही जोडले नव्हते. पती- पत्नी एकत्रीकरणासाठी अंतर चुकीचे दाखवून दिशाभूल करण्यात आली. तर पोलीस पाटील, रेशन दुकानदार, बोगस संस्थेचे कर्मचारी, पतसंस्थेचे कर्मचारी दाखवून काही शिक्षकांनी पती- पत्नी एकत्रीकरणाचा लाभ घेतला आहे. घटस्फोटीता, स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य यामध्ये काहींनी चूकीची माहिती भरुन दिशाभूल केली आहे. संवर्ग-१ व संवर्ग-२ मध्ये माहिती भरणाºया ७० टक्के शिक्षकांनी चुकीची व दिशाभूल करणारी माहिती भरल्याने अनेक शिक्षक विस्थापित झाल्याने या तक्रारी आल्या होत्या.

टॅग्स :BeedबीडTeacherशिक्षकMarathwadaमराठवाडा