वैद्यकीयसाठी गुरूंनीच दिला शिष्यांना मदतीचा हात; योगेश्वरीतील प्राध्यापकांचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:32 IST2020-12-29T04:32:10+5:302020-12-29T04:32:10+5:30
महाविद्यालयातून १२ वी उत्तीर्ण झालेले वैभव गौतम भालेराव व दीक्षांत गौतम भालेराव या विद्यार्थ्यांची नीट परीक्षेतून गुणानुक्रमे वैद्यकीयसाठी निवड ...

वैद्यकीयसाठी गुरूंनीच दिला शिष्यांना मदतीचा हात; योगेश्वरीतील प्राध्यापकांचा आधार
महाविद्यालयातून १२ वी उत्तीर्ण झालेले वैभव गौतम भालेराव व दीक्षांत गौतम भालेराव या
विद्यार्थ्यांची नीट परीक्षेतून गुणानुक्रमे वैद्यकीयसाठी निवड झाली. हे दोन्हीही भाऊ
अतिशय हुशार असून, त्यांची आर्थिक परिस्थती नाजूक असल्याची माहिती महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना मिळाली. त्यामुळे त्यांचा आधार आता आपणच झाले पाहिजे, ही जाणीव लक्षात घेऊन सर्वांनी मिळून ४६ हजार २७० रुपयाचा निधी संकलित करून ती रक्कम विद्यार्थी व त्यांच्या पालकांकडे सुपूर्द केली. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आर.डी.
जोशी यांच्या हस्ते ती सुपूर्द करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. आर. व्ही. कुलकर्णी, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य व्ही. एन. जोशी, एम.सी.व्ही.सीचे उपप्राचार्य पंडितराव कराड, कनिष्ठ
विभागाचे पर्यवेक्षक डॉ. गणेश पिंगळे, समन्वयक प्रा. डॉ. व्ही. एस. हमदे व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
शिक्षणासाठी हातभार
प्रतिकूल परिस्थिती व आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेले होतकरू विद्यार्थ्यी गुणवत्ता असूनही उच्च शिक्षण घेऊन शकत नाहीत. या गुरुंनीच केलेल्या मदतीमुळे विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी हातभार लागला आहे. केवळ आर्थिक कारणांमुळे हे गुणवंत विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणापासून वंचित राहू नयेत, या हेतूने गरजू विद्यार्थ्यांना सर्वांच्या सहकार्याने ही आर्थिक मदत देण्यात आली. या मदतीमुळे आमच्या पाल्यांना आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण करता येत असल्याच्या भावना पालकांनी व्यक्त केल्या.