माजलगावात पकडला दोन लाखांचा गुटखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 00:43 IST2018-02-06T00:43:21+5:302018-02-06T00:43:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क माजलगाव : शहरातील झेंडा चौक भागातील पवन लोढा याच्या घरी उपविभागीय पोलीस अधिकारी भाग्यश्री नवटके यांनी ...

माजलगावात पकडला दोन लाखांचा गुटखा
लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : शहरातील झेंडा चौक भागातील पवन लोढा याच्या घरी उपविभागीय पोलीस अधिकारी भाग्यश्री नवटके यांनी पथकासह छापा टाकला. यामध्ये दोन लाख रु पयांचा गुटखा जप्त करु न आरोपी पवन लोढाला ताब्यात घेतले. ही कारवाई सोमवारी रात्री ८ वा. करण्यात आली. या कारवाईने खळबळ उडाली आहे.
पवन लोढा याच्या घरी गुटखा असल्याची माहिती नवटके यांना मिळाली. त्यांनी आपल्या खबºयामार्फत खात्री करुन घेतली. त्यानंतर पथकासह लोढा याच्या घरावर छापा टाकला. यामध्ये विविध कंपनीचा गुटखा आढळून आला. हा सर्व गुटखा पोलिसांनी जप्त केला असून, पुढील कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासनास कळविले असल्याचे सूत्रांनी सांगितले.