चौसाळा महाविद्यालयात मार्गदर्शन कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:27 IST2021-01-13T05:27:48+5:302021-01-13T05:27:48+5:30
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. माणिक चव्हाण यांनी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचे विचार समाज उभारणीत कसे मोलाचे ...

चौसाळा महाविद्यालयात मार्गदर्शन कार्यक्रम
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. माणिक चव्हाण यांनी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचे विचार समाज उभारणीत कसे मोलाचे आहेत यावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. परमेश्वर वाणी यांनी, तर प्रा. चांगदेव शेळके यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कोविड-१९ चे सर्व नियमांचे पालन करून बहुसंख्येने उपस्थित होते.
संयुक्त जयंती साजरी
बीड : येथील विचारवंत बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या कार्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची संयुक्त जयंती साजरी झाली. प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई तुर्भे येथील उद्योजक सिद्धार्थ गरड हे उपस्थित होते. संस्थापक अध्यक्ष प्रशांत पंडित यांनी त्यांचा सत्कार केला. आभार प्रदर्शन अमोल पंडित यांनी केले. संस्थेचे पदाधिकारी पांडुरंग पंडित, प्रल्हाद वाघमारे, दिलीप वाघमारे, किशोर पंडित, कुणाल जाधव उपस्थित होते.
शिवसंग्राम भवनमध्ये जिजाऊंना अभिवादन
बीड : राजमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त येथील शिवसंग्राम भवनमध्ये रामहरी मेटे यांच्या हस्ते जिजाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येऊन जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी अनिल घुमरे, ज्ञानेश्वर कोकाटे, नवनाथ प्रभाळे, सुहास पाटील, सातीराम ढोले, मुकुंद गोरे, कैलास शेजाळ, सुशीलकुमार उबाळे, बाबू सुरवसे, महाराज बागलाने, मीरा डावकर, साधना दातखेळ, मनीषा कोकाटे, स्वाती मस्के, राजू येडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.