शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्री अजित पवारांची बीड जिल्हयावर पकड नाही, म्हणूनच गुंडगिरी वाढली: मनोज जरांगे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 20:11 IST

परळी तालुक्यातील लिंबोटा येथील युवक शिवराज दिवटे हा गुंडांकडून मारहाणीत जखमी झाल्याने त्याच्यावर सध्या अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अंबाजोगाई : जिल्ह्यात गुंडगिरीच्या माध्यमातून हल्ले होतच राहणार. आम्ही काय नुसत्या भेटीच देत फिरायचं का? असा सवाल करीत ही गुंडगिरी निर्माण झालेलं विदारक वातावरण दूर करण्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेणार आहोत. पालकमंत्री अजित पवार यांची बीड जिल्ह्यावर पकड राहिली नाही. त्यामुळेच गुंडगिरी वाढत चालली असल्याची टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली.

परळी तालुक्यातील लिंबोटा येथील युवक शिवराज दिवटे हा गुंडांकडून मारहाणीत जखमी झाल्याने त्याच्यावर सध्या अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवारी दुपारी जरांगे पाटील यांनी शिवराज याची भेट घेतली. शिवराजच्या अंगावरील बेदम मारहाण केलेले व्रण पाहून अंगावर काटा येतो. सामूहिक कट रचून त्याला जिवे मारण्यासाठीच त्याचे अपहरण केले. मात्र, लोक धावून आल्याने त्याचा जीव वाचला. अशा घटना वारंवार घडूनही सरकार काहीच करत नाही, असा आरोपही जरांगे यांनी केला.

पाच आरोपींना मंगळवारपर्यंत पोलीस कोठडीशिवराज दिवटे हल्ला प्रकरणात पाच जणांना संभाजीनगर पोलिसांनी शनिवारी अटक करून परळी न्यायालयात हजर केले. त्यांना २० मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर दोघा अल्पवयीन मुलांना बीडच्या बाल न्यायालयात हजर करून त्यांची बाल सुधार गृहात रवानगी केली. उर्वरित आरोपींच्या शोधासाठी संभाजीनगर पोलिसांनी दोन पथके नियुक्त केल्याचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे यांनी सांगितले.

सर्व लोकप्रतिनिधी पालकमंत्र्यांशी चर्चा करूमी भेट देणार आहे. आमची दहशत कमी झालेली नाही, हे दाखविण्यासाठी अशी मारहाण केली आहे. संतोष देशमुख यांचा तर बळी घेतलाच, पण हादेखील पार्ट टू होण्यापासून वाचला. सोमवारी डीपीसीच्या बैठकीआधीच आम्ही सर्व लोकप्रतिनिधी पालकमंत्र्यांशी चर्चा करू. दिवटे प्रकरणही गंभीर आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांनीच आरोपींवर मकोका लावण्याचे आदेश द्यावेत.- सुरेश धस, आमदार, आष्टी

प्रशासनाचा वचक राहिला नाहीवर्षानुवर्षे खुर्चीला चिटकून बसलेल्या लोकांच्या बदल्या झाल्याशिवाय परळीतील गुंडगिरी कमी होणार नाही. तसेच एसपी लेव्हलची स्वतंत्र व्यक्ती परळी व परिसरासाठी आवश्यक आहे, तरच येथील गुंडगिरी कमी होईल. सत्तेच्या जिवावर गुंडगिरी व मस्ती सुरूच आहे. कायद्याचा धाक नसल्याने व्हिडीओ व्हायरल करून मारहाण केली जाते. या गुंडगिरीवर प्रशासनाचा वचक राहिला नाही.- बजरंग साेनवणे, खासदार बीड

टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलAjit Pawarअजित पवार