कड्यात वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:34 IST2021-04-04T04:34:53+5:302021-04-04T04:34:53+5:30
आष्टी : आष्टी तालुक्यातील कडा शहरात कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शहरातील नागरिकांनी सतर्क राहावे. शहरात विनामास्क फिरणा-यावर ...

कड्यात वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय
आष्टी : आष्टी तालुक्यातील कडा शहरात कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शहरातील नागरिकांनी सतर्क राहावे. शहरात विनामास्क फिरणा-यावर कारवाईचा बडगा उचला, दंडात्मक कारवाई करा. सर्वांनी अँटीजन टेस्ट करावी, कोरोना लस घेण्याचे आवाहन आ. सुरेश धस यांनी केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आ. सुरेश धस यांनी येथील बाजार समितीमध्ये प्रशासन व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्याप्रसंगी ते बोलत होते.
आष्टी तालुक्यातील कडा ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. या ठिकाणी दररोज ४० ते ५० खेडेगावातील लोकांचा संपर्क आहे. शिवाय या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती असल्याने तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे; परंतु कड्यामध्ये नागरिक शिस्त पाळताना दिसून येत नाहीत. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या शहरांमध्ये मृत्यूचे प्रमाणही वाढलेले आहे. यासाठी कड्यातील सर्व व्यापारी व नागरिकांनी टेस्ट करणे गरजेचे आहे. लसीकरण करून घेण्याचे आवाहनही धस यांनी केले.
कडा शहरामध्ये बाहेरून येणाऱ्या नागरिकांनाही पोलिसांनी जाब विचारला पाहिजे. दुपारी १ वाजल्यानंतर सर्वच्या सर्व दुकाने बंद ठेवली पाहिजे तसेच व्यापाऱ्यांनी व नागरिकांनी मास्क हा कायमस्वरूपी वापरलाच पाहिजे, असा आग्रह आ. धस यांनी या बैठकीत घेतला. वरील नियमांचे पालन न करणाऱ्या व्यक्तींना पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवण्याचे आवाहन ही सुरेश धस यांनी केले. याप्रसंगी तहसीलदार राजाभाऊ कदम, नायब तहसीलदार प्रदीप पांडुळे, सपोनि भरत मोरे, सरपंच अनिल ढोबळे, ग्रामसेवक आबासाहेब खिलारे यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते, व्यापारी व नागरिक उपस्थित होते
===Photopath===
030421\img-20210403-wa0194_14.jpg
===Caption===
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आ सुरेश धस यांनी येथील बाजार समितीमध्ये प्रशासन व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली.