शिवसेनेतर्फे अभिवादन कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:48 IST2021-01-08T05:48:29+5:302021-01-08T05:48:29+5:30

भगवानबाबा प्रतिष्ठानवर श्रद्धांजली बीड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा राज्याचे माजी उच्च शिक्षण संचालक के.पी. ...

Greetings program from Shiv Sena | शिवसेनेतर्फे अभिवादन कार्यक्रम

शिवसेनेतर्फे अभिवादन कार्यक्रम

भगवानबाबा प्रतिष्ठानवर श्रद्धांजली

बीड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा राज्याचे माजी उच्च शिक्षण संचालक के.पी. सोनवणे यांना बीड येथील श्रीसंत भगवानबाबा सामाजिक प्रतिष्ठानवर श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी डॉ. एस.एल. लहाने, डॉ. प्रभाकर धायतडक, प्राचार्य डॉ. वसंतराव सानप, प्रा. आर.टी. गर्जे, डॉ. मन्मथअप्पा हेरकर, नारायण नागरे, दादासाहेब मुंडे, डॉ. माधव सानप, डॉ. शिवाजी सानप आदी उपस्थित होते.

विमला विद्यालयात जयंतीनिमित्त कार्यक्रम

गेवराई : येथील विमला माध्यमिक विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त पाचवी ते दहावीतील मुलींनी वक्तृत्व सादर केले. तसेच निबंध लेखनातही सहभाग घेतला. सूत्रसंचालन ज्ञानेश्वरी थेटे व श्रावणी जवंजाळ यांनी केले, ती तर आभार श्रावणी वाडकर हिने मानले. मुख्याध्यापक कैलास जोगदंड, प्रमुख पाहुणे नरेंद्र कुलकर्णी, सुधाकर ससाणे, सुनील जाधव, नितीन कुलथे उपस्थित होते.

सरस्वती विद्यालयात जयंती उत्साहात

धारूर : शहरातील सरस्वती प्राथमिक विद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी झाली. प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक काशीनाथ दळवे यांनी महिला शिक्षिकांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. यावेळी सर्व शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Greetings program from Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.