शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

लोकनेत्यास अभिवादन करण्यासाठी गोपीनाथ गडावर अलोट गर्दी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 15:31 IST

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी सकाळ पासूनच राज्याच्या कानाकोपर्‍यातून कार्यकर्त्यांनी गोपीनाथ गडावर अलोट गर्दी केली होती. विविध भागातून रथ, दिंडी, पताका, टाळ मृदंगासह येत मुंडे अनुयायी समाधी स्थळावर पोहोचले.

ठळक मुद्देदिंडी, पताका, रथयात्रा, संघर्ष ज्योत  घेऊन कार्यकर्ते महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून दाखल वैद्यनाथ च्या दुर्घटनेतील मयत कर्मचाऱ्यांना वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली 

परळी ( बीड ) : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी सकाळ पासूनच राज्याच्या कानाकोपर्‍यातून कार्यकर्त्यांनी गोपीनाथ गडावर अलोट गर्दी केली होती. विविध भागातून रथ, दिंडी, पताका, टाळ मृदंगासह येत मुंडे अनुयायी समाधी स्थळावर पोहोचले. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना. पंकजा मुंडे, खा. डाॅ. प्रितम मुंडे यांनी  कुटूंबियांसह गडावर उपस्थित राहून सर्वाचे अभिवादन स्विकारले. दरम्यान, वैद्यनाथ कारखान्यातील दुर्घटनेत मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांना यावेळी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात नुकत्याच झालेल्या दुर्घटनेमुळे गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने जयंतीदिनी आयोजित केलेले सामाजिक उपक्रमांचे सर्व कार्यक्रम रद्द करून जयंती साधेपणाने साजरी करण्याचा निर्णय घेतला होता.महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून मुंडे अनुयायी लाखोंच्या संख्येने लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी गोपीनाथ गडावर जमा झाले होते. भगवानगडाहून आलेली भगवानगड ते गोपीनाथ गड, नांदेड येथून हनुमान गड ते गोपीनाथ गड अशी अॅड. रमेश धात्रक यांची रथयात्रा आणि शिखर शिंगणापूर ते गोपीनाथ गड अशी डाॅ. राजेंद्र खाडे यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष ज्योत घेऊन कार्यकर्ते मोठ्या संख्येने गडावर आले होते. या दोन्ही यात्राचे ना. पंकजा मुंडे, खा. डाॅ. प्रितम मुंडे यांनी स्वागत केले.

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीसमोर लाखो अनुयायांनी सकाळपासूनच नतमस्तक होण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. सकाळी ना. पंकजा मुंडे, खा. डाॅ. प्रितमताई मुंडे, प्रज्ञा मुंडे, डाॅ. अमित पालवे, अॅड. यशश्री मुंडे,  अगस्त्य खाडे आदी कुटूंबातील सदस्यांनी मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. वैद्यनाथ साखर कारखान्यात नुकत्याच झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांना यावेळी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 

यावेळी राज्याचे पशूसंवधर्न व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, आ. आर. टी. देशमुख, आ. लक्ष्मण पवार, आ. संगीता ठोंबरे, आ. भीमराव धोंडे, बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे,  जि. प. अध्यक्षा सविता गोल्हार, माजी आमदार केशवराव आंधळे, भाजपचे प्रवक्ते गणेश हाके, ज्येष्ठ नेते फुलचंद कराड, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, राधाताई सानप, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आदित्य सारडा, बंजारा नेते मांगीलाल चव्हाण, कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवराव अघाव, रामराव खेडकर, धम्मानंद मुंडे, भास्कर रोडे, विजय गोल्हार, संतोष हंगे, नगराध्यक्ष स्वरूपसिंह हजारी, सहाल चाऊस, अजित वरपे, विजयकुमार बंब, नरेंद्र कांकरिया, दिलीप खिस्ती आदीसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेPritam Mundeप्रीतम मुंडे