ग्रामसेवक निलंबित
By Admin | Updated: April 10, 2015 00:35 IST2015-04-10T00:03:07+5:302015-04-10T00:35:03+5:30
बीड : विविध योजनांमध्ये अपहार केल्याचा ठपका ठेवून गुरूवारी परळी तालुक्यातील लमाणतांडा ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकाला तडकाफडकी निलंबित करण्यात आले.

ग्रामसेवक निलंबित
बीड : विविध योजनांमध्ये अपहार केल्याचा ठपका ठेवून गुरूवारी परळी तालुक्यातील लमाणतांडा ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकाला तडकाफडकी निलंबित करण्यात आले.
एम. एस. फड असे त्या ग्रामसेवकाचे नाव आहे. २०१०-११ व २०११-१२ मध्ये ग्रा.पं. अंतर्गत अंगणवाडी, तांडावस्ती, दलितवस्ती बांधकामासाठी ६ लाख ७५ हजार रूपयांची रक्कम आली होती. ग्रा. पं. च्या खात्यावरून ग्रामसेवक फड यांनी रक्कम उचलली. मात्र काम केले नाही. सीईओ नामदेव ननावरे यांनी फड यांच्या निलंबनाचे आदेश काढले. निलंबन काळात फड यांना माजलगाव पंचायत समिती हे मुख्यालय देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)