फुलेपिंपळगाव शिवारात ग्रामसेवकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:30 IST2021-02-15T04:30:18+5:302021-02-15T04:30:18+5:30
परतूर तालुक्यातील हातडी येथील रहिवासी असलेले ग्रामसेवक अशोक विश्वनाथ फटींग यांनी मागील १२ वर्षांपासून माजलगाव तालुक्यात अनेक गावांमध्ये ...

फुलेपिंपळगाव शिवारात ग्रामसेवकाची आत्महत्या
परतूर तालुक्यातील हातडी येथील रहिवासी असलेले ग्रामसेवक अशोक विश्वनाथ फटींग यांनी मागील १२ वर्षांपासून माजलगाव तालुक्यात अनेक गावांमध्ये ग्रामसेवक म्हणून काम केले होते. ते सध्या भाटवडगाव येथे राहत होते. त्यांनी आठ दिवसांपूर्वीच भाटवडगाव येथे एक घर विकत घेतले होते. रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घरून पेट्रोल आणण्यासाठी गेले होते. नवीन मोंढ्याजवळ फुलेपिंपळगाव शिवारात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. या घटनेची माहिती परिसरातील शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी आजूबाजूच्या लोकांना सांगितल्यानंतर पोलीस दाखल घटनास्थळी झाले.
त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण कळू शकले नाही. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.