शासनाने जुनी पेन्शन योजना जाहीर करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:23 IST2021-06-25T04:23:43+5:302021-06-25T04:23:43+5:30
अंबाजोगाई : राज्यात १ नोव्हेंबर २००५ पूर्वी विनाअनुदानित, अंशत: अनुदानित पदांवर व तुकड्यांवर नियुक्त तसेच २००५ नंतर १०० टक्के ...

शासनाने जुनी पेन्शन योजना जाहीर करावी
अंबाजोगाई : राज्यात १ नोव्हेंबर २००५ पूर्वी विनाअनुदानित, अंशत: अनुदानित पदांवर व तुकड्यांवर नियुक्त तसेच २००५ नंतर १०० टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शासनाने १९८२ ची जुनी पेन्शन योजना तातडीने जाहीर करावी, अशी मागणी शिक्षक मैत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय रापतवार यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन त्यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पाठविले आहे.
राज्यातील १ नोव्हेंबर २००५ पूर्वी विनाअनुदानित, अंशत: अनुदानित पदांवर व तुकड्यांवर नियुक्त असलेल्या सुमारे २५ हजार शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनीच पेन्शन लागू करावी, या मागणीसाठी राज्यभरात शिक्षक भारती संघटनेकडून अनेक आंदोलने करण्यात आली. महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय सभापतींनी दिलेल्या निर्देशानुसार उपरोक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याबाबत करण्यासाठी २४ जुलै २०१९ ला एक संयुक्त समिती गठित करण्यात आली; परंतु दोन वर्षे उलटले तरी समितीचा अभ्यास अद्याप पूर्ण झालेला नाही. समितीने आपला निर्णय तात्काळ द्यावा व शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी विजय रापतवार यांनी केली आहे.