घाटनांदूर येथे शासकीय हमीभाव; तूर खरेदीसाठी नोंदणी करण्याचे आवाहन .
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:25 IST2021-01-10T04:25:32+5:302021-01-10T04:25:32+5:30
तूर नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी सात अ बारा, पीक पेरा प्रमाणपत्र, बँक पासबुक झेरॉक्स व मोबाइल नंबर या संपूर्ण कागदपत्रासह नोंदणी ...

घाटनांदूर येथे शासकीय हमीभाव; तूर खरेदीसाठी नोंदणी करण्याचे आवाहन .
तूर नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी सात अ बारा, पीक पेरा प्रमाणपत्र, बँक पासबुक झेरॉक्स व मोबाइल नंबर या संपूर्ण कागदपत्रासह नोंदणी करावी. शासनाचा हमीभाव तब्बल ६ हजार रुपये असल्याने त्याचा फायदा बळीराजाला होणार आहे. हरभरा उत्पादन अद्याप झालेले नाही. हरभरा पिकाची खरेदीही शासकीय हमीभावाने संस्था करणार असून शासनाकडून नोंदणी साठी आदेश आल्यानंतर हरभरा पिकाची नोंद घेण्यात येणार आहे. तत्पूर्वी फक्त तूर पिकाची नोंदणी घेण्यात येणार असल्याचेही सभापती गोविंद देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना तारखेचा मोबाइलवर मेसेज आल्यानंतर आपले उत्पादित केलेली तूर माप करण्यासाठी खरेदी केंद्रावर आणावे, असे आवाहन संस्थेने केले. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शासकीय हमीभावाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सभापती गोविंद देशमुख, कृउबा संचालक सत्यजित सिरसाट, सचिव प्रताप गित्ते यांनी केले आहे.