वीकेंड लॉकडाऊनला वडवणीत चांगला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:33 IST2021-04-11T04:33:27+5:302021-04-11T04:33:27+5:30
वडवणी : जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात ३० एप्रिलपर्यंत विविध कडक निर्बंध लागू केले ...

वीकेंड लॉकडाऊनला वडवणीत चांगला प्रतिसाद
वडवणी : जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात ३० एप्रिलपर्यंत विविध कडक निर्बंध लागू केले आहेत. यात वीकेंड लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी शनिवारीतालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी आपआपले व्यवसाय बंद करून जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन केल्याचे दिसून आले. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आता नागरिकांनीच ही लढाई हातात घेतले असल्याचे चित्र पहावयास मिळाले.
तालुक्यात मार्चमध्ये एकूण ९० अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले तर नऊ दिवसात नवे ७७ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आल्याने शहराला व ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झाल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. नागरिकांनी कुटुंब सुरक्षित ठेवण्याचे गांभिर्य बाळगावे. प्रशासनाला सहकार्य करावे. न दिसणा-या शत्रूबरोबरचा हा लढा सुध्दा आपण घरीच बसुन जिंकू शकतो असे आवाहन तहसीलदार वैशाली पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. एम. बी. घुबडे यांनी केले आहे.
===Photopath===
100421\20210410_102311_14.jpg