शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑफर देणारे, अटी ठेवणारेही तेच, त्यामुळे मी..."; राज-उद्धव एकत्र येण्यावर CM फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
2
"जाऊ दे यार, कामाचं बोला"; राज-उद्धव एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे चिडले
3
"माय नेम इज खान"! LSG साठी आवेशची 'हिरोगिरी' यॉर्करचा मारा करत RR च्या हातून हिसकावून घेतला सामना
4
शेकापच्या संतोष पाटलांच्या दोन्ही मुलांचा वेळास बीचवर एकाच वेळी मृत्यू; बहिणीचा मुलगाही सुमद्रात बुडाला
5
रशिया-युक्रेन युद्ध थांबले; तीन दिवस युद्धविराम जाहीर, व्लादिमीर पुतिन यांची घोषणा
6
कॅनडात बस स्टॉपवर भारतीय तरुणीची गोळीबारात हत्या; हल्लेखोरांना दुसऱ्यावर चालवायची होती गोळी
7
Vaibhav Suryavanshi : "छोटा पॅक बडा धमाका"! पहिल्याच बॉलवर सिक्सर.. तेही लॉर्ड शार्दुल ठाकूरसमोर
8
IPL 2025 GT vs DC : बटलर इज बॉस! दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत गुजरात टायटन्सनं रचला इतिहास
9
"देशात धार्मिक युद्ध भडकवण्यासाठी सुप्रीम कोर्ट जबाबदार"; मर्यादेबाहेर जाताय म्हणत भाजप खासदाराची टीका
10
वाळूमाफियांची आता खैर नाही! नियमांचे उल्लंघन केल्यास थेट डेपो होणार रद्द, सर्वांना नोटीस जारी
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर मनसे नेते नाराज? म्हणाले, “त्यांनी आम्हाला दोनदा फसवलेय”
12
8व्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; सरकार या 35 पदांवर करणार नवीन नियुक्त्या
13
IPL 2025 Video: भरमैदानात झाला राडा !! इशांत शर्मा भडकला, आशुतोषवर बोट रोखलं, नेमकं काय घडलं?
14
राज ठाकरेंशी युती झाल्यास उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का?; संजय राऊत म्हणाले...
15
Big Breaking: तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात अखेर डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल
16
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी पदार्पणासह रचणार इतिहास; जाणून घ्या सविस्तर
17
Video - अग्निकल्लोळ! एका ठिणगीमुळे बोटीला भीषण आग; १४८ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
“मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमुळे राज ठाकरेंची उपयुक्तता सर्वांना वाटत आहे”: छगन भुजबळ
19
“राहुल गांधींचा ‘डरो मत’ संदेश अमलात आणू, एकता, अखंडतेची मशाल घेऊन वाटचाल करू”: सपकाळ
20
IPL 2025 Video: 'सुपरमॅन' कॅच! विपराजला हवा होता चौकार, पण जोस बलटरने हवेत उडत घेतला भन्नाट झेल

बीड जिल्हावासीयांसाठी खुशखबर! वर्षाखेरपर्यंत अहमदनगर ते इगनवाडीपर्यंत धावणार रेल्वे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2023 12:14 IST

अहमदनगर- बीड -परळी हा एकूण २६१.२५ किमी लांबीचा प्रकल्प असून इगनवाडीपर्यंत तब्बल १३३.३ किमीचे काम लवकरच पूर्णत्वास येत आहे

- नितीन कांबळेकडा ( बीड) : वर्षभरापूर्वी अहमदनगर ते न्यू आष्टी रेल्वेची फेरी सुरू झाली आहे. दरम्यान, आता न्यू आष्टी ते इगनवाडी हा ६७.१२ कि.मी.चा रेल्वेमार्ग पूर्णत्वास येत आहे. वर्षाखेर अहमदनगर ते इगीनवाडीपर्यंत रेल्वे धावणार असल्याची माहिती आहे. अहमदनगर- बीड -परळी हा एकूण २६१.२५ किमी लांबीचा प्रकल्प असून इगनवाडीपर्यंत तब्बल १३३.३ किमीचे काम लवकरच पूर्णत्वास जात असल्याने बीड जिल्हावासियांनी आनंद व्यक्त केला आहे.  

गेल्या अनेक वर्षापासून बीडकरांचे अधुरे राहिलेले स्वप्न आता पूर्णत्वाकडे जात असून अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे काम प्रगती पथावर आहे. हा मार्ग एकूण २६१.२५ कि.मी. चा आहे. दरम्यान, २३ सप्टेंबर २०२२ रोजी अहमदनगर-न्यू आष्टी हा ६६.१८ किमीचा मार्ग पूर्ण झाला असून  रेल्वेची नियमित फेरीही सुरू झाली. आता दुसऱ्या टप्यात न्यू आष्टी ते इनगवाडी हे हा ६७.१२ कि.मी.चा मार्ग या वर्षाअखेर पूर्ण होणार असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली आहे. या रेल्वे प्रकल्पाची एकूण किंमत- ४८०८.१७ कोटी असून आजपर्यंतचा खर्च- ३६४६.०९ कोटी खर्च केले आहेत. या कामाची एकूण भौतिक प्रगती- ७८%, जमीन संपादन पूर्ण-१८२१ हेक्टर पैकी १८०६ हेक्टर म्हणजे ९९% जमिन संपादीत झाली आहे. आता इगनवाडी ते परळी हा १२७.९५ कि.मी. रेल्वे प्रकल्पाचे काम प्रगती पथावर आहे.

न्यू आष्टी ते इनगवाडी आतापर्यंत पूर्ण झालेली कामे: अर्थ वर्क-४३० LCum/४१८ LCum (९७%)प्रमुख पूल- ६४/४९ (७७%)छोटे पूल/RUB- ३०२/२४९ (८२%)रोड ओव्हर ब्रिज- ६५/१४(२१%)रोड अंडर ब्रिज- १३०/११० (८५%)स्टेशन इमारती- २१/१० (२९%)ट्रॅक लिंकिंग-२६१/११५ 115 किमी (४४%)पॉवर लाईन क्रॉसिंग- ६२६/५६८(९१%)बॅलास्ट पुरवठा-७.५२/६.४४ एलसीएम (८६%)विद्युतीकरण- निविदा मंजूर झाली.

टॅग्स :Beedबीडrailwayरेल्वेtourismपर्यटन