शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सबका मंगल हो! धनंजय मुंडे मन:शांतीसाठी इगतपुरी येथील विपश्यना केंद्रात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 15:58 IST

माजी मंत्री धनंजय मुंडे हे निकटवर्तीय वाल्मीक कराडांमुळे अडचणीत; मंत्रिपदही गेले

परळी : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे सध्या नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील विपश्यना केंद्रात मन:शांतीसाठी आठवड्यापासून ध्यानधारणा करीत असल्याचे समोर आले आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात निकटवर्तीय वाल्मीक कराड याचा सहभाग आढळण्यासह देशमुखांच्या हत्येचे फोटो, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.

९ डिसेंबर २०२४ रोजी मस्साजाेगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. यात धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराड हा मास्टरमाइंड असल्याचे समोर आले. त्याच्यावर मकोकाही लागला. या प्रकरणाचे दोषारोपपत्र दाखल हाेताच देशमुखांना मारहाण करतानाचे संतापजनक फोटो व्हायरल झाले. त्यानंतर राज्यभरात पडसाद उमटले आणि धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मुंडे यांनी मात्र सोशल मीडियावर पोस्ट करीत आजारपणाचे कारण दिले होते. त्यानंतर करुणा शर्मा यांनीही त्यांच्यावर आरोप केले व या प्रकरणात न्यायालयाने त्यांना पोटगी देण्याचेही आदेश दिले होते. त्यातच त्यांना बेल्स पालसी हा दुर्मीळ आजारही झाला. ते आता कोणालाही न सांगता इगतपुरीच्या विपश्यना केंद्रात मन:शांतीसाठी दाखल झाले आहेत. आठवड्यापासून ते तेथेच असून, आणखी दोन दिवस राहणार असल्याचे सांगण्यात आले.

छगन भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेशधनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. त्यानंतर त्यांच्या जागी ओबीसी नेते छगन भुजबळ यांची वर्णी लागली. एवढेच नव्हे तर मुंडे यांच्याकडील खातेही भुजबळ यांच्याकडेच देण्यात आले आहे. या सर्व प्रकरणांमुळेच त्यांनी मन:शांतीचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

धनंजय मुंडे का चर्चेत?दोन दिवसांपूर्वी माजलगावचे माजी आमदार आणि परळी तालुक्यातील मोहा येथील रहिवासी आर. टी. देशमुख यांचे लातूर जिल्ह्यात अपघाती निधन झाले होते. त्यानंतर लगेच मंत्री पंकजा मुंडे यांनी धाव घेतली. अंत्यसंस्कारालाही त्या हजर होत्या; परंतु माजी मंत्री धनंजय मुंडे कोठेही दिसले नाहीत. त्यामुळे त्यांच्याबाबत चर्चा सुरू झाल्या आणि ते विपश्यना केंद्रात असल्याचे समोर आले.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेMeditationसाधनाBeedबीड