उत्तम आरोग्य हीच खरी धन संपदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:29 IST2021-03-22T04:29:43+5:302021-03-22T04:29:43+5:30
घाटनांदूर : येथील भारतीय स्टेट बँक शाखा व आयुर्वेल लाईफ केअर, मुंबई तसेच अंबाजोगाई येथील संत गाडगेबाबा सेवाभावी संस्थेंतर्गत ...

उत्तम आरोग्य हीच खरी धन संपदा
घाटनांदूर : येथील भारतीय स्टेट बँक शाखा व आयुर्वेल लाईफ केअर, मुंबई तसेच अंबाजोगाई येथील संत गाडगेबाबा सेवाभावी संस्थेंतर्गत "आधार माणुसकीचा" उपक्रमाच्या पुढाकाराने बँक कर्मचारी व बँक ग्राहक यांच्यासाठी आरोग्य तपासणी शिबिर शनिवारी पार पडले.
कोविड १९च्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारची वैद्यकीय तपासणी करून घेण्यासाठी प्रत्येक नागरिकाच्या मनात भीती वाटत आहे. परंतु माणसाच्या आयुष्यात कामाच्या तणावामुळे व वयोमानानुसार शरीरात वेगवेगळ्या आरोग्य समस्या निर्माण होत असतात. त्यामुळे त्याची पूर्वकल्पना मिळावी, यासाठी मधुमेह, रक्तदाब, नाडी परीक्षण, डायट सल्ला, फॅट, टेम्प्रेचर, ऑक्सिजन, प्रकृती परीक्षण या प्रकारच्या तपासण्या आरोग्य शिबिरात मोफत करण्यात आल्या. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोग्य तपासणी करून घेतली. याप्रसंगी बँकेचे शाखाप्रमुख शरदकुमार वर्मा म्हणाले, सध्याच्या काळात उत्तम आरोग्य हीच खरी माणसाची धन-संपदा आहे. प्रत्येक माणसाने आपले आचार- विचार- आहार शुद्ध ठेवल्यास प्रत्येकाचे आरोग्य निश्चितच सुदृढ राहू शकते. प्रत्येकाने नियमितपणे व्यायाम करणे महत्त्वाचे आहे. याप्रसंगी उपव्यवस्थापक राकेश सिंग, मंदार देशपांडे, सचिन हिवरेकर, डॉ. दीपक मोरे, डॉ. संत, दीपक सोनवणे, बिट्टू सिंग आदी उपस्थित होते.
"आधार माणुसकीचा" उपक्रमाच्या माध्यमातून बीड - लातूर जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या केलेल्या व वंचित कुटुंबातील ४०० विद्यार्थी यांना शिक्षणासाठी पाठबळ देण्याचे कार्य संस्था करत आहे. वंचित कुटुंबातील सात विद्यार्थी महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेत आहेत. उपक्रमातील ४०० विद्यार्थ्यांसाठी लागणारा निधी लोकसभागातून उपलब्ध करून खर्च केला जात आहे.
- ॲड. संतोष पवार, संत गाडगेबाबा सेवा भावी संस्था, अंबाजोगाई
===Photopath===
210321\21bed_1_21032021_14.jpg