शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
2
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
3
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
4
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
5
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
6
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
7
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
8
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
9
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
10
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
11
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
12
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
13
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
14
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
15
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
16
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
17
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
18
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
19
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
20
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…

शिवसेनेला दे धक्का; माजी नगराध्यक्षांचा केसीआर यांच्या बीआरएस पक्षात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2023 12:19 PM

कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनीही बीआआरएस अर्थात भारत राष्ट्र समिती या तेलंगणाच्या सत्ताधारी पक्षात काही दिवसांपूर्वीच प्रवेश केल्याचे सोशल मिडीयावर जाहीर केले

मुंबई/बीड - तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या सत्ताधारी पक्ष बीआरएसने काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. नांदेडमध्ये सभा घेतल्यानंतर राव यांनी पक्षवाढीसाठी सर्व पर्याय खुले असल्याचे जाहीर केले होते. आजीमाजी खासदार, आमदारांना बीआरएसमध्ये येण्याचे निमंत्रण पक्षप्रमुखांनी दिले आहे. बीड जिल्ह्यातील माजलगावचे राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी भारत राष्ट्र समितीचे प्रमुख (BRS) आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर बीड जिल्ह्यात खळबळ उडाली असतााच आता बीडचे माजी नगराध्यक्ष दिलीप गोरे यांनीही बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे. गोरे हे शिवसेनेचे बीड जिल्हाध्यक्ष होते. 

कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनीही बीआआरएस अर्थात भारत राष्ट्र समिती या तेलंगणाच्या सत्ताधारी पक्षात काही दिवसांपूर्वीच प्रवेश केल्याचे सोशल मिडीयावर जाहीर केले. मागील लोकसभा निवडणुकीत जाधव यांनी घेतलेल्या मतांनी उलटफेर घडत शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला. त्यामुळे, एमआयएमचे इम्तियाज जलील छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडून आले होते. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जाधव यांचा नव्या पक्षातील प्रवेश उत्सुकता वाढवणारा आहे. तर, नांदेडनंतर बीआरएसने आता बीड जिल्ह्याकडे आपला मोर्चा वळवल्याचे दिसून येते.  

बीडचे माजी नगराध्यक्ष दिलीप गोरे आणि ऊसतोड कामगारांचे नेते शिवराज बांगर यांनी चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे. हैदराबाद येथील प्रगती भवन येथे हा जाहीर प्रवेश झाला. केसीआर यांनी महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडे पक्षाची नोंदणी केली आहे. तर, राज्यातील सहा विभागातील समन्वयकांच्या नावाची घोषणा देखील यावेळी करण्यात आली. दरम्यान, या पक्षप्रवेशानंतर लवकरच बीडमध्ये मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची सभा होणार असल्याचे सांगण्यात येते. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केल्याचे जाहीर केले. सोशल मीडियात एका व्हिडिओच्या माध्यमातून जाधव यांनी पक्ष प्रवेश केल्याचे जाहीर केले. तेलंगणात शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. हा बदल करण्यासाठी महाराष्ट्रातील सत्ता घेणाऱ्या के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाकडे देण्यात यावी. यासाठी काम करणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.  

टॅग्स :MumbaiमुंबईK Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावBeedबीडNCPराष्ट्रवादी काँग्रेसMayorमहापौर