न्यूमोकाेकल लस बालकाच्या उजव्या मांडीत अन् सावकाश द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:21 IST2021-07-12T04:21:53+5:302021-07-12T04:21:53+5:30
बीड : बालमृत्यू रोखण्यासाठी न्यूमोकोकल लस जिल्ह्याला उपलब्ध झाली आहे. ती देण्याबाबत बीड तालुक्यातील ११ आरोग्य केंद्रे आणि ६३ ...

न्यूमोकाेकल लस बालकाच्या उजव्या मांडीत अन् सावकाश द्या
बीड : बालमृत्यू रोखण्यासाठी न्यूमोकोकल लस जिल्ह्याला उपलब्ध झाली आहे. ती देण्याबाबत बीड तालुक्यातील ११ आरोग्य केंद्रे आणि ६३ उपकेंद्रांतील कर्मचाऱ्यांना रविवारी प्रशिक्षण देण्यात आले. न्यूमोकाेकल ही लस बालकाच्या उजव्या मांडीत द्या. त्रास होऊ देऊ नका, सावकाश द्या, अशा सूचना तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नरेश कासट यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या. तसेच ताप आला तरी मातांना धीर देण्याबाबतही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात कोरोनाने कहर मांडला आहे. दोन लाटेने अगोदरच जनता परेशान असताना आता तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. ही लाट बालकांसाठी धोकादायक असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच न्यूमोनिया, मेनिनजायटीस व सेफ्टीसेमिया या आजारापासून बालकांचे संरक्षण होऊन मृत्युदर कमी व्हावा, यासाठी न्यूमोकोकल लस उपलब्ध झाली आहे. बीड जिल्ह्याला तीन हजार डोस मिळाले असून, आरोग्य विभागाकडून ही लस देण्याबाबत प्रशिक्षण दिले जात आहे. अगोदर तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांना माहिती दिल्यानंतर आता कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.
दरम्यान, रविवारी बीड तालुक्यातील ११ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ६३ उपकेंद्रांतील समुदाय आरोग्य अधिकारी, एएनएम, स्टाफ नर्स, आरोग्य सेवक, आरोग्य सहायक व सहायिकांना तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नरेश कासट यांनी प्रशिक्षण दिले. पहिला डोस ६ आठवडे, दुसरा १४ आठवडे, तर तिसरा बुस्टर डोस हा नवव्या महिन्यात द्यावा. प्रत्येकवेळी ०.५ मिली औषध भरून उजव्या मांडीत द्यावे. हे देताना बालकाला त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याबाबतही डॉ. कासट यांनी सूचना केल्या.
...
पालकांनो, ताप आला तरी घाबरू नका
न्यूमोकोकल ही लस दिल्यानंतर बालकाला सौम्य ताप व लस दिलेल्या ठिकाणी त्रास होण्याची शक्यता आहे. अशावेळी पालकांनी घाबरून जाऊ नये. कोणतीही लस दिली तरी सौम्य ताप येतच असतो. लस दिल्यानंतर पॅरासिटामल औषध दिले जाते. ते बालकाला व्यवस्थित द्यावे. ही लस सुरक्षित आहे, असे डॉ. नरेश कासट यांनी सांगितले.
110721\11_2_bed_16_11072021_14.jpeg
बीड तालुक्यातील कर्मचाऱ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण व सुचना करताना तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नरेश कासट.