शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

सोयरीकीस नकार दिल्याने मुलीच्या आई-वडिलास बदडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 19:01 IST

मुलीच्या आई-वडिलास बेदम मारहाण करून मुलीस पळवून नेण्याची धमकीसुद्धा दिली

ठळक मुद्देमुलगी सध्या प्रवरानगर येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे.मुलीचे शिक्षण सुरु असल्याने तिचे लग्न आत्ताच करायचे नाही तिच्या आई वडिलांनी सांगितले

पाटोदा (बीड ) : अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीस लग्नासाठी मागणी घातली असता तिच्या आई-वडिलांनी त्यास नकार दिला. त्यामुळे मुलाच्या चिडलेल्या कुटुंबीयांनी मुलीच्या आई-वडिलास बेदम मारहाण करून मुलींना पळवून नेण्याची धमकी दिल्याची घटना पाटोदा तालुक्यात मंगळवारी घडली. 

पाटोदा तालुक्यातील मुगगाव येथील शेतकरी त्रिंबक लक्ष्मण भवर यांची मुलगी सध्या प्रवरानगर येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. तिचे लग्न माज्या मुलासोबत लावून दे, अशी मागणी हौसराव बाबा खोटे याने केली होती. परंतु, मुलीचे शिक्षण सुरु असल्याने तिचे लग्न आत्ताच करायचे नाही, असे त्रिंबक यांनी हौसरावला सांगितले होते. त्यामुळे हौसरावला राग आलेला होता.

मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास त्रिंबक हे त्यांची पत्नी द्वारकाबाई यांच्यासह स्वत:च्या घरात बसले असताना हौसराव बाबा खोटे, इंदूबाई अरूण खोटे, महेश हौसराव खोटे, अरूण बाबा खोटे, विश्वनाथ बाबा खोटे आणि बबन बाबा खोटे हे सहाजण तिथे आले आणि तुझ्या मुलीचे लग्न माझ्या पोरासोबत करून दे, म्हणू लागले. त्रिंबक यांनी त्यास नकार देताच तुझ्या पोरीचे लग्न दुसरीकडे कसा करतोस ते पाहतोच असे म्हणत मुलींना पळवून नेण्याची धमकी महेशने दिली.

एवढ्यावरच न थांबता त्या सहा जणांनी घरात घुसून त्रिंबक आणि त्यांच्या पत्नीस शिवीगाळ करत काठीने आणि लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. भवर दांपत्याचा आरडाओरडा ऐकून जमा झालेल्या शेजाऱ्यांनी त्यांची आरोपींचा तावडीतून सुटका केली. या प्रकरणी सहाही आरोपींवर त्रिंबक भवर यांच्या फिर्यादीवरून अंमळनेर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmarriageलग्नPoliceपोलिस