बीडमध्ये चौथ्या मजल्यावरून पडल्याने मुलीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 23:29 IST2018-03-18T23:29:24+5:302018-03-18T23:29:24+5:30
भांडे घासत असताना पाय घसरून चौथ्या मजल्यावरून पडल्याने एका १३ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना ऐन गुढी पाडव्याच्या दिवशी सकाळी बीड शहरातील बार्शी रोडवर राष्ट्रवादी भवनजवळ घडली. करिश्मा खंडारिया (१३) असे मयत मुलीचे नाव आहे.

बीडमध्ये चौथ्या मजल्यावरून पडल्याने मुलीचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : भांडे घासत असताना पाय घसरून चौथ्या मजल्यावरून पडल्याने एका १३ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना ऐन गुढी पाडव्याच्या दिवशी सकाळी बीड शहरातील बार्शी रोडवर राष्ट्रवादी भवनजवळ घडली.
करिश्मा खंडारिया (१३) असे मयत मुलीचे नाव आहे.
गुढी पाडव्याचा सण असल्याने करिश्मा लवकरच उठली होती. पूजा करण्यापूर्वी ती घरकाम निपटत होती. याच वेळी ती भांडे घासण्यासाठी गॅलरीत बसली होती. पाण्यावरून पाय घसरल्याने ती चौथ्या मजल्यावरून खाली पडली. ऐन डोक्यावर पडल्याने गंभीर जखम झाली होती.
परिसरातील लोकांनी ही घटना पाहिल्यावर तात्काळ तिला जिल्हा रूग्णालयात दाखल केले, परंतु तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.