परळीत भरधाव जीपच्या धडकेत बालिका ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 00:58 IST2017-12-23T00:58:20+5:302017-12-23T00:58:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क परळी : भरधाव जीपच्या धडकेत गंभीर जखमी १० वर्षीय बालिकेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी जीपचालकावर गुन्हा ...

परळीत भरधाव जीपच्या धडकेत बालिका ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
परळी : भरधाव जीपच्या धडकेत गंभीर जखमी १० वर्षीय बालिकेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी जीपचालकावर गुन्हा नोंद झाला आहे. हा अपघात तालुक्यातील रामनगर तांड्यावर १३ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० झाला होता.
तिसरीच्या वर्गातील दैवशाला पप्पू मुंडे (वय १० रा. रामनगर तांडा, हिवरा गोवर्धन ता. परळी) ही बालिका १३ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता सुमारास कासारवाडी येथून देवदर्शनाहून घराकडे येत होती. याचवेळी सिरसाळ्याकडून येणाºया भरधाव जीपने (एमएच ४४ के ३००३) तिला जोरदार धडक दिली. यात दैवाशाला गंभीर जखमी झाल्याने तिला अंबाजोगाई येथील स्वा.रा.ती. रुग्णालयात व तिथून पुढे लातूर येथील विवेकानंद रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु, १४ डिसेंबरला उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. २० डिसेंबर रोजी दैवशालाची आई राधिका पप्पू मुंडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद झाला आहे.