दहा लिटरचे तीन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:21 IST2021-07-03T04:21:38+5:302021-07-03T04:21:38+5:30

कोरोनाचा प्रादुर्भाव व प्रसार पाहता ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या ३ मशिनरी भेट देण्यात आल्या. यावेळी शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गजानन ...

Gift of three oxygen concentrators of ten liters | दहा लिटरचे तीन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट

दहा लिटरचे तीन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट

कोरोनाचा प्रादुर्भाव व प्रसार पाहता ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या ३ मशिनरी भेट देण्यात आल्या. यावेळी शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गजानन रुद्रवार यांनी मशिनरीचा स्वीकार केला. यावेळी त्यांनी इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्युमन व्हॅल्यू व एटलास कॉपको या दोन्ही संस्थानचे आभार मानले.

यावेळी आमदार प्रकाश सोळंके, सुशील सोळंके, प्रा. प्रदीप सोळंके, डॉ. सचिन डक तसेच आर्ट ऑफ लिव्हिंगचे जिल्हा व्यवस्थापन सदस्य सचिन फपाळ, आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक व रोटरी क्लब माजलगाव सिटीचे सचिव श्रीकृष्ण शेजुळ, नंदकुमार शिंदे, बाळासाहेब सोनार, भागवत शिंदे, स्वयंसेवक अशोक शिंदे, दत्ता फपाळ, दत्ता पंडित, गणेश घाटूल, संजय मेहता, भिलारे आप्पा उपस्थित होते. या मशीनमुळे रुग्णांची सोय होईल. याबद्दल अधिकारी, कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

020721\purusttam karva_img-20210702-wa0036_14.jpg

Web Title: Gift of three oxygen concentrators of ten liters