माजलगावात भर पावसात घागर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:40 IST2021-09-08T04:40:14+5:302021-09-08T04:40:14+5:30

माजलगाव : शहरातील दालमील रोड जवळील महेबूबनगर, रहेमतनगर, अक्सा मशीद येथील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याने, प्रहार जनशक्ती ...

Ghagar Morcha in heavy rain in Majalgaon | माजलगावात भर पावसात घागर मोर्चा

माजलगावात भर पावसात घागर मोर्चा

माजलगाव : शहरातील दालमील रोड जवळील महेबूबनगर, रहेमतनगर, अक्सा मशीद येथील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याने, प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने नगरपरिषदेवर मंगळवारी भरपावसात घागर मोर्चा काढण्यात आला. दुपारी १२ वाजता भर पावसात निघालेल्या या मोर्चात आंदोलकांनी आपल्या डोक्यावर रिकामे हंडे घेऊन नगरपरिषदेच्या कारभाराचा निषेध केला.

प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने दिलेल्या निवेदनात गेल्या अनेक वर्षांपासून वरील वस्त्यांमध्ये पिण्याचे पाणी नसून, तेथील नागरिकांचे पिण्याच्या पाण्यावाचून हाल होत आहेत. येथील नागरिकांनी वेळोवेळी निवेदनेही दिली आहेत. या भागातला पाइपलाइन केली नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. नगरपरिषदेने दखल घेतली नसल्याने येथील नागरिकांनी वाजत गाजत भर पावसात घागर मोर्चा काढला. यावेळी नागरिकांनी डोक्यावर रिकामे हंडे घेऊन नगरपरिषदेसमोर ठिय्या मांडत आपल्या मागण्या लावून धरल्या. यावेळी संघटनेचे अध्यक्ष गोपाळ पैजने, उपाध्यक्ष नितीन कांबळे, नजीर कुरेशी इत्यादी पदाधिकाऱ्यांसह नागरिक सहभागी होते.

070921\purusttam karva_img-20210907-wa0076_14.jpg

Web Title: Ghagar Morcha in heavy rain in Majalgaon