गेवराई तालुक्यात वर्षभरात १,४३९ जणांना कोरोना, ४९ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:29 IST2021-04-03T04:29:40+5:302021-04-03T04:29:40+5:30

गेवराई तालुक्यात कोरोनाचा पहिला रूग्ण इटकूर या गावात आढळल्यानंतर संपूर्ण वैद्यकीय यंत्रणा व प्रशासन हादरले. १६ मे २०२० ...

In Gevrai taluka, 1,439 people died and 49 died during the year | गेवराई तालुक्यात वर्षभरात १,४३९ जणांना कोरोना, ४९ जणांचा मृत्यू

गेवराई तालुक्यात वर्षभरात १,४३९ जणांना कोरोना, ४९ जणांचा मृत्यू

गेवराई तालुक्यात कोरोनाचा पहिला रूग्ण इटकूर या गावात आढळल्यानंतर संपूर्ण वैद्यकीय यंत्रणा व प्रशासन हादरले. १६ मे २०२० पासून ते १ एप्रिल २०२१ पर्यंतच्या कालावधीत तालुक्यातील १,४३९ जणांना कोरोनाची लागण झाल्याची नोंद आहे. तर यात तालुक्यातील ४९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. या रोगाचा संसर्ग अजून मोठ्या प्रमाणात वाढल्याने व्यापारी पेठेत कडक निर्बंध लावले आहेत. तर दररोज जिल्ह्यात तीनशेपेक्षा जास्त रूग्ण निघत आहेत.

चौकट

तालुक्यात आजपर्यंत दहा हजार ॲंटीजेन चाचण्या तर ७,६०० आरटीपीसीआर अशा एकूण १७ हजार ६०० चाचण्या करण्यात आल्या आहेत. एक वर्षात १,४३९ रूग्ण कोरोना बाधित आढळले.

आता गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना प्रतिबंधक लस आल्याने येथील उपजिल्हा रुग्णालयात जवळपास ६,३०६ नागरिकांनी लस घेतली तर तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रात ४,५३० जणांनी कोरोना प्रतिबंध लस घेतली. तालुक्यातील सर्वांनी ही लस घ्यावी असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. मुकेश कुचेरिया यांनी केले आहे.

===Photopath===

020421\02bed_6_02042021_14.jpg~020421\02bed_5_02042021_14.jpg

Web Title: In Gevrai taluka, 1,439 people died and 49 died during the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.