गेवराई, परळी पोलिसांनी पकडले दुचाकीचोर

By Admin | Updated: October 22, 2015 21:03 IST2015-10-22T21:03:41+5:302015-10-22T21:03:41+5:30

गेवराई पोलिसांनी पकडलेल्या दुचाकी. बुधवारचे छायाचित्र. गेवराई / परळी : दुचाकी पळविणार्‍या टोळीला गजाआड करण्यात बुधवारी गेवराई, परळी पोलिसांना यश आले

Gevarai, Parri police caught the twig | गेवराई, परळी पोलिसांनी पकडले दुचाकीचोर

गेवराई, परळी पोलिसांनी पकडले दुचाकीचोर

 गेवराई पोलिसांनी पकडलेल्या दुचाकी. बुधवारचे छायाचित्र. गेवराई / परळी : दुचाकी पळविणार्‍या टोळीला गजाआड करण्यात बुधवारी गेवराई, परळी पोलिसांना यश आले. गेवराईत ८, तर परळीत ६ दुचाकी जप्त करण्यात आल्या.
गेवराई पोलिसांनी कुंडलिक बन्सी राठोड (रा. निपाणी जवळका, ता. गेवराई) याच्याकडून दुचाकी जप्त केल्या. गेवराईसह औरंगाबाद, जालना येथून त्याने दुचाकी पळविल्या होत्या. निरीक्षक सुरेंद्र गंधम, फौजदार ऐटवार, आर. ए. सांगडे, एस. आर. पवार यांनी कारवाई केली.
परळी शहर पोलिसांनी दोन आरोपींना गजाआड करीत सहा दुचाकी हस्तगत केल्या. तेजस भोईटे (रा. माणिकनगर, परळी) व उन्केश फड (रा. मरळवाडी, ता. परळी) अशी आरोपींची नावे आहेत. निरीक्षक सोपानराव निघोट यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकातील जमादार दत्तू उबाळे, सचिन सानप, आचार्य, जुक्टे, राऊत यांनी कारवाई केली. कसून चौकशी सुरू आहे. (वार्ताहर)

Web Title: Gevarai, Parri police caught the twig

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.