गावित यांची नगरपालिकेत दिवसभर कसून चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:02 IST2021-03-04T05:02:26+5:302021-03-04T05:02:26+5:30
माजलगाव : येथील नगरपालिका अंतर्गत विविध रस्त्याचे काम न करताच संगनमताने केलेल्या १ कोटी ६१ लाख रूपयांच्या अपहार ...

गावित यांची नगरपालिकेत दिवसभर कसून चौकशी
माजलगाव : येथील नगरपालिका अंतर्गत विविध रस्त्याचे काम न करताच संगनमताने केलेल्या १ कोटी ६१ लाख रूपयांच्या अपहार प्रकरणी अटक केलेल्या तत्कालीन मुख्याधिकारी बी.सी.गावित यास मंगळवारी नगर परिषदेत आणून दिवसभर कसून चौकशी करण्यात आली. २०१६ मधील रस्ते विकास कामासाठी आलेल्या १ कोटी ६१ लाख रुपये रस्ते व नाल्या न करताच नगराध्यक्ष ,मुख्याधिकारी व दोन लेखापाल यांनी संगनमताने अपहार केल्याचा आरोप आहे. यामध्ये तत्कालीन मुख्याधिकारी गावित याच्या विरोधात गुन्हे दाखल झाल्यानंतर ते १४ महिन्यांपासून फरार होते. ते शुक्रवारी आष्टी पोलिसात स्वतः होऊन हजर झाले. ते सध्या ७ दिवसांच्या पोलीस कोठडीत असून मंगळवारी त्यांची येथील नगरपालिकेत दिवसभर कसून चौकशी करण्यात आली.
यावेळी आष्टीचे उपविभागीय अधिकारी तथा तपास अधिकारी विजय लगारे यांच्या सोबत सहायक पोलिस उपनिरीक्षक नंदकुमार ठोंबरे, पोलीस नाईक विकास राठोड,शिपाई रामनाथ शिनगारे यांचा समावेश होता.