शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

स्वच्छ महाराष्ट्र अभियानात गेवराई नगर पालिका ‘टॉपर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 12:46 AM

बीड : शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी नगर परिषद, नगर पंचायतने कंबर कसली आहे. जिल्ह्यात ७९.६५ टक्के शौचालयांचे बांधकाम पूर्ण झालेले ...

ठळक मुद्देबीड पालिकेचा नीचांकनगर पंचायतमध्ये पाटोदा आघाडीवर

बीड : शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी नगर परिषद, नगर पंचायतने कंबर कसली आहे. जिल्ह्यात ७९.६५ टक्के शौचालयांचे बांधकाम पूर्ण झालेले असून, इतर कामे प्रगतीपथावर आहेत. नगर पालिकेत गेवराई, तर नगरपंचायतमध्ये पाटोदा अव्वलस्थानी आहे. बीड पालिकेचा मात्र यामध्ये सर्वात निचांक आहे.

स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत महानगरपालिका, नगर परिषदा, नगर पंचायतींना शौचालयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. शहरे हागणदरीमुक्त करण्यासाठी २ आॅक्टोबरपर्यंत मुदत दिली होती. त्या दृष्टीने पालिका, पंचायतींनी योग्य नियोजन करुन ओडी स्पॉट निश्चित करुन तेथे पथकांची नियुक्ती केली. कोणीही उघड्यावर शौचास जाणार नाही याची काळजी घेण्याबरोबरच मार्गदर्शन केले जात होते. पालिकांची ही मेहनत उद्दिष्टप्राप्तीसाठी फायद्याची ठरली. जिल्ह्यातील ११९ ओडी स्पॉट शंभर टक्के निष्कासित करण्यात आले.

दरम्यान, नगर पालिका व नगर पंचायतच्या वतीने लाभार्थ्यांना शौचालय बांधण्यासाठी अनुदान देण्यात आले. त्यामुळे त्याचा फायदा झाला. उर्वरित लाभार्थ्यांनाही लवकरच अनुदान वाटप करण्यात येणार आहे.

बीडमध्ये लाटले अनुदान : गुन्हे दाखल नाहीतबीड पालिकेत राजकारण्यांनी अधिकारी व कर्मचाºयांना काम करणे जिकिरीचे केले आहे. कर्मचाºयांवर दबाव आणने, त्यांना दमदाटी करणे असे प्रकार नेहमीच करतात. मात्र, कारवाई व भीतीपोटी तक्रार देण्यास कोणीही पुढे येत नाही. हाच धागा पकडून काही धनदांडग्यांनी राजकारण्यांना हाताशी धरीत अधिकारी व कर्मचाºयांवर दबाव आणून शौचालय न बांधताच अनुदान लाटले आहे. त्यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात कारवाई संदर्भात पत्र दिले मात्र राजकीय भीतीपोटी अद्यापही त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले नाहीत.

पालिकेतील राजकारणच शौचालयांची टक्केवारी निचांकी आणण्यास कारणीभूत ठरत आहे. मदतीऐजवी दमदाटी व अडथळे आणण्याचा प्रकार सुरु असल्याने संताप व्यक्त होत आहे.