शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

माजलगावात दागिने लुटणारी महिलांची टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2019 6:29 PM

या टोळीत चार महिलांसह एका पुरूषाचा समावेश आहे.

ठळक मुद्देमाजलगाव शहर पोलिसांची कामगिरी एका पुरूषाचाही समावेश

माजलगाव (बीड ) : बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत महिलांचे दागिनले लंपास करणाऱ्या महिलांच्या टोळीला गजाआडा करण्यात आले आहे. ही कारवाई माजलगाव शहर पोलिसांनी रविवारी सायंकाळी माजलगाव बसस्थानकात केली. या टोळीत चार महिलांसह एका पुरूषाचा समावेश आहे. या कारवाईने गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे.

सोयाबीन हरिभाऊ भोसले (१९ रा.सावरगाव) सुभाष सोमाजी उमाप (४५ रा.ब्रम्हगाव) धूपता परमेश्वर जाधव (५० रा.गांधीनगर, बीड), शोभा संजय भालेराव (४० रा.रमाई चौक, बीड),  मंगल सतीश तुसाबर (४२ रा.बलभीमनगर, बीड) अशी पकडलेल्या टोळीतील आरोपींची नावे आहेत. सादोळा येथील माधुरी सोळंके या बीडला आपल्या माहेरी जाण्यासाठी माजलगाव बसस्थानकात आल्या. बराचवेळ थांबूनही बस आली नाही. दुपारी ३ वाजेच्या सुमारास बीडसाठी बस येताच तिच्यात बसण्यासाठी एकच गर्दी झाली. हीच संधी साधून त्यांच्या गळ्यातील अडीच तोळ्याचे गंठल चोरट्यांनी लंपास केले. बसमध्ये बसल्यावर त्यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तात्काळ शहर पोलीस ठाणे गाठले.

पोलीस निरीक्षक सय्यद सुलेमान, पोउपनि एस.एस.बिराजदार यांनी स्थानकात धाव घेत कॅमेरे तपासले. यावेळी त्यांना काही महिलांवर संशय आला. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास त्यांनी सोयाबीन आणि सुभाषला ताब्यात घेतले. पोलीस हिसका दाखविताच त्यांनी आपल्या इतर साथीदारांची नावे सांगितले. त्यानंतर रविवारी रात्रीच माजलगाव पोलीस बीडमध्ये आले. त्यांनी आणखी तीन महिलांना ताब्यात घेतले. सोमवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना ६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर अधीक्षक अजित बोºहाडे, पोनि सय्यद सुलेमान यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि एस.एस.बिराजदार, सफौ. सुंदर पवार, पोना किशोर राऊत, श्रीमंत पवार, संजिवणी सोन्नर आदींनी केली.

हमाली बनून महिलांवर वॉचसुभाष हा बसस्थानकातच हमाली करतो. महिलांच्या गळ्यातील दागिने, पोलीस आहेत का? या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन या महिला चोरट्यांना देतो. त्यानंतर या महिला संधी साधून धक्काबुक्की  आणि गर्दी करीत महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास करतात. तर शोभा ही कुख्यात गुन्हेगार गझणीची आई आहे.

टॅग्स :ArrestअटकCrime Newsगुन्हेगारीBeedबीड