बीडमध्ये मोबाइल चोरांची टोळी पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:22 IST2021-07-12T04:22:05+5:302021-07-12T04:22:05+5:30
बीड : शहरातील पेठ भागात मोबाइल चोरांच्या टोळीला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. १० जुलै रोजी सायंकाळी बालाजी ...

बीडमध्ये मोबाइल चोरांची टोळी पकडली
बीड : शहरातील पेठ भागात मोबाइल चोरांच्या टोळीला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. १० जुलै रोजी सायंकाळी बालाजी मंदिरासमोर काही जण संशयितरीत्या दिसून आले. हे इसम चोरीच्या उद्देशाने एकत्र जमल्याचा पोलिसांना कयास होता. पेठ बीड ठाण्याचे पोह नसीर शेख बशीर यांनी संशयित चौघांना ताब्यात घेतले असता, त्यांच्याकडे २० हजार रुपये किमतीचा जुना वापरता चोरीचा मोबाइल मिळून आला. या प्रकरणी परशुराम गायकवाड, विठ्ठल लष्करे, सनी पतंगे, प्रवीण जाधव रा. बीडसांगवी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर यांना ताब्यात घेतले.
-------------
अपघातातील मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल
बीड : भरधाव कारने धडक दिल्याने रिक्षामधील रोहिदास दादाराव काळे (रा. अंबेसावळी, ता. बीड) यांचा मृत्यू झाला तर अन्य प्रवासी जखमी झाले होते. १३ जून रोजी पिंपळनेर ते घाटसावळी रस्त्यावर तांड्यानजीक हा अपघात झाला होता. या प्रकरणी १० जुलै रोजी मसुराम काळे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात कारचालकाविरुद्ध पिंपळनेर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोना शेख करीत आहेत.
----------